Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते एसा स्पोर्ट्स विकचे पारितोषिक वितरण संपन्न
    Ahmednagar

    आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते एसा स्पोर्ट्स विकचे पारितोषिक वितरण संपन्न

    newstoday24By newstoday24March 18, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते एसा स्पोर्ट्स विकचे पारितोषिक वितरण संपन्न

    एसा भवन राज्यात दिशादर्शक ठरेल – आ. संग्राम जगताप

    नगर : वाडीया पार्क सारख्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून अनेक खेळाडू घडत असून राज्य सरकार कडून वाडीया पार्क मध्ये आणखी सुविधा आणण्यासाठी निधी आणला. प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कमीत कमी कुठल्या तरी एका प्रकारचा व्यायाम आवश्यक आहे, एसा असोसिएशनचे सभासद एकत्र येऊन वर्षभर विविध उपक्रम राबवत असतात तसेच बांधकाम क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती सभासदांना देण्याचे काम करत असतात या माध्यमातून युवा आर्किटेक्टस् इंजिनीअर्स यांना प्रेरणा मिळते, त्यांच्या माध्यमातून शहरात नियोजनबद्ध प्रकल्प उभे राहत असून सौंदर्यकरणात भर पडते, शहर विकासात एसा असोसिएशनचा मोठा वाटा असून ते एक महत्वाचा घटक आहे, एसा असोसिएशनच्या माध्यमातून एसा भवन उभारत असून राज्यातील आर्किटेक्टस् इंजिनीअर्स यांना दिशादर्शक ठरेल असे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले
    एसा स्पोर्ट्स विकचे पारितोषिक वितरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश कार्ले, प्रितेश पाटोळे, अन्वर शेख, सभासद असलेले मीनल काळे, इक्बाल सय्यद, विकार काझी, सुरेश परदेशी, संजय चांडवले, बाबूजी ससाणे, अनिल आठरे, श्रद्धा अंदूरे, वैशाखी हिरे आणि सिनिअर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर या संस्थेने मागील सप्ताहात स्पोर्ट्स विकचे आयोजन केले होते. यामध्ये मॅरेथॉन, टेबल टेनिस, स्विमिंग, बॅडमिंटन, चेस, कॅरम, फुटबॉल आणि क्रिकेट अश्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही क्रीडा स्पर्धेत सहभाग घेणे आणि नेहमी मैदानी खेळत सहभागी राहणे हे निरोगी जीवनासाठी अत्यावश्यक असल्याचे क्रीडा समिती अध्यक्ष भूषण पांडव यांनी नमूद केले आणि याच उद्देशाने दर वर्षी संस्था क्रीडा सप्ताहाचे आयोजन करत असल्याचे सांगितले. या स्पोर्ट्स विकचा समारोप क्रिकेट मॅचेसने झाला. क्रिकेटच्या साखळी सामन्यांमध्ये अमेय कुलकर्णी, आदिनाथ दहिफळे आणि ओजस नवले यांनी सामनावीर पुरस्कार मिळाला. सिनियर सभासदांच्या झालेल्या रंगतदार सामन्यात अविनाश कुलकर्णी कप्तान असलेल्या अध्यक्षीय टीमला विजेते पद तर मधुकर बालटे कप्तान असलेल्या टीमला उपविजेतेपद मिळाले. या सामन्याचा सामनावीर पुरस्कार अरुण गावडे यांना मिळाला. वैभव निमसे यांच्या एसा ब्लास्टर संघाला विजेतेपद मिळाले. एसा किंग्ज संघाचे कप्तान असलेल्या प्रिन्स फुलसौंदर संघाला उपविजेतेपद तर अमेय कुलकर्णी कप्तान असलेल्या एसा मास्टर संघाला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार अमेय कुलकर्णी यांना मिळाला. बेस्ट फलंदाज ओजस नवले, बेस्ट बॉलर आदिनाथ दहिफळे आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार प्रविण शिंदे यांना मिळाला.
    यश दायमा यांनी संस्थेने आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धांचे कौतुक करून संस्थेच्या अश्या उपक्रमाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती आवश्यक असल्याचा संदेश शहरवाशीयांमध्ये जात असल्याचे नमूद केले.
    ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी स्पोर्ट्स कमिटी सदस्य अभिजित देवी, झोहेब खान, जितेश सचदेव आणि अमेय कुलकर्णी यांनी काम पाहिले. या उपक्रमास प्रायोजकत्व दिलेले पोलाद स्टील कंपनीचे यश दायमा आणि सुशांत गव्हाणे उपस्थित होते. या समारंभाचे सूत्र संचालन अजय दगडे तर आभार प्रदर्शन सचिव प्रदिप तांदळे यांनी केले.

    #Ahmednagar #Breaking #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleस्व.दिलीपजी गांधी यांचे नगरच्या विकासात मोलाचे योगदान – आ. निलेश लंके 
    Next Article समता नगर येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण व श्री गजानन महाराज मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ संपन्न
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.