समता नगर येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण व श्री गजानन महाराज मंदिर येथे पेव्हिंग ब्लॉक कामाचा शुभारंभ संपन्न
विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकतेचे काम देखील तितकेच महत्त्वाचे – अभय आगरकर
नगर : शहरांमध्ये नियोजनबद्ध विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी मोठा निधी मंजूर करून दिला आहे त्यानुसार कामे सुरू आहे समता नगर परिसरातील रस्ता अनेक दिवसापासून खराब झालेला होता त्या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी नागरिक सातत्याने पाठपुरावा करत असून आता निधी उपलब्ध करून दिला आहे लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे विकासाच्या कामाबरोबरच धार्मिकतेचे काम देखील तितकेच महत्त्वाचे असून त्यासाठी मंदिरांचे सुशोभीकरण व सभामंडपाचे काम उभे राहत आहे असे प्रतिपादन भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांनी केले.
समता नगर येथे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण व श्री गजानन महाराज मंदिर येथे पेविंग ब्लॉक कामाचा शुभारंभ भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी माजी नगरसेवक रामदास आंधळे, माजी नगरसेविका संगीता खरमाळे, माजी नगरसेवक नितीन शेलार, संपत नलावडे, भाजपाच्या महिला शहर जिल्हाध्यक्ष प्रिया जानवे, कुमार नवले,अमित गटणे, सुजित करमाळे, सचिन कुसळकर, राजू मंगलाराम, दत्तात्रेय रच्चा, विनोद भिंगारे, संतोष बडवे, विश्वनाथ निर्वाण ,अशोक दहिफळे, चिन्मय पंडित, साधना भिसे, संगीता धामणे, सरोजिनी रच्चा, रेणुका करंदीकर, संध्या जाधव, ज्योती अनेकर, छाया कुलकर्णी, प्रज्ञा रसाळ, पुष्पा मंगलाराम, वैशाली मंगलाराम, कृष्णाबाई बोरुडे, अंजली खरमाळे, ममता पाटीदार, शारदा पाटीदार, जयश्री जाधव, आदी उपस्थित होते.
अमित गटणे म्हणाले की, गुलमोहर रोड परिसरातील श्री गजानन महाराज मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या परिसराचे सुशोभीकरणाचे काम मार्गी लागावे म्हणून भाविकांची मागणी होती त्यानुसार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पेव्हिंग ब्लॉगसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे आता हे काम लवकरच मार्गी लागणार आहे असे ते म्हणाले