प्रोफेसर कॉलनी येथील साधना हाउसिंग सोसायटी मध्ये माजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्या पाठपुराव्यातून व खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ संपन्न.
नियोजनबद्ध व दर्जेदार कामे मार्गी लावणे हे आमचे कर्तव्य : माजी नगरसेविका आशाताई कराळे
नगर : प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये काम केले असून, टप्प्याटप्प्याने विकासाच्या योजना मार्गी लावले आहे. खा.डॉ.सुजय विखे पाटील आणि महापालिकेच्या माध्यमातून मोठा निधी मंजूर झाला आहे. नियोजनबद्ध व दर्जेदार कामे मार्गी लावणे हे आमचे कर्तव्य आहे. निधी कागदावर न ठेवता नागरिकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष प्रभागातील कामे मार्गी लावले आहे.त्या माध्यमातून जनतेशी स्नेहबंध निर्माण झाला आहे, असे प्रतिपादन माजी नगरसेविका आशाताई कराळे यांनी केले.
प्रोफेसर कॉलनी येथील साधना हाउसिंग सोसायटी मध्ये माजी नगरसेविका आशाताई कराळे यांच्या पाठपुराव्यातून व खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माजी नगरसेविका आशाताई कराळे, माजी नगरसेवक मनोज दुल्लम, माजी नगरसेविका सोनाबाई शिंदे, तायगा शिंदे, करण कराळे, सतीश शिंदे, विमल राजदेव, सविता छाजेड, पूजा वाघ, हर्षदा डोळसे, राधिका हिवाळे, चंद्रकांत हिवाळे आदी उपस्थित होते.
माजी महापौर बाबासाहेब वाकळे म्हणाले की, खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येकप्रभागातील विकास कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार शहरांमध्ये सर्वत्र विकासाची कामे सुरू आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वांनी विकास कामांना मतदान करून खा.डॉ.सुजय विखे पाटील यांना आशीर्वाद द्यावे, असे ते म्हणाले.