महिला दिनानिमित्त माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने कर्तृत्ववान व आदर्श महिलांचा सन्मान सोहळा संपन्न
कर्तृत्ववान आदर्श महिलांचा गुणगौरव करणे गरजेचे – आयुक्त पंकज जावळे
नगर : क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी पुणे येथे पहिली शाळा काढून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. आज महिला चूल आणि मूल एवढ्या गोष्टीपर्यंत मर्यादित न राहता आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये यशाचे शिखर गाठले आहे. आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळून श्री शक्ती समाजामध्ये यशस्वीपणे वाटचाल करीत आहे माजी उपमहापौर गणेश भोसले हे नेहमीच शहरांमध्ये विविध संकल्पना अमलात आणत यशस्वीपणे राबवत असतात महिलांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा यासाठी कर्तृत्ववान आदर्श महिलांचा गुणगौरव करणे गरजेचे आहे त्या माध्यमातून युवतींमध्ये प्रेरणा निर्माण होईल असे प्रतिपादन मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले
बुरुडगाव रोड येथे महिला दिनानिमित्त माजी उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने कर्तृत्ववान व आदर्श महिलांचा सन्मान सोहळा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, मा. उपसभापती मीना चोपडा, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेविका मनीषा भागानगरे, माजी नगरसेवक संजय चोपडा, समाज प्रबोधक सोपान कनेरकर, संगीता भोसले आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या
माजी उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, प्रभागातील नागरिकांना बरोबर घेऊन विकासाच्या योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. जनतेने दिलेल्या प्रोत्साहनामुळे काम करण्याची प्रेरणा मिळत असते. सध्याच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या संस्कृतीचे जतन व्हावे, यानिमित्त समाजप्रबोधक सोपान कनेरकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच शहरातील महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला असे ते म्हणाले
समाज प्रबोधक सोपान कनेरकर म्हणाले की, भारतीय संस्कृती महान असून तिचे जतन होणे आवश्यक आहे द्राक्ष जसे नासवंत होतात रुद्राक्ष नाशवंत होत नाही त्याप्रमाणेच आपली भारतीय संस्कृती रुद्राक्ष प्रमाणे आहे, आपण भारत माता की जय म्हटल्यानंतर आदिशक्तीचा जागर होतो, प्रत्येक महिला आपल्याला चांगले जीवन जगण्याचे शिकवते, आपले जीवन दुसऱ्याच्या उत्कर्षासाठी कामाला आले पाहिजे, तुम्ही कसे जगता हे महत्त्वाचे नाही तर तुम्ही समाजामध्ये कसे वागता हे महत्त्वाचे आहे, माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी कामाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये ऋणानुबंध निर्माण केला आहे समाज प्रबोधनासाठी नागरिकांनी एकत्र येऊन आपल्याला लाभलेल्या संस्कृतीचे जतन करावे यासाठी आपले सण उत्सव मोठ्या उत्साहात साजरे करावे असे ते म्हणाले