नगरकरांनो सावधान..! नगर शहरात पुन्हा बिबट्याचे दर्शन …
अहमदनगर : सारसनगर येथील रहिवाशीयांनी काळजी घ्यावी. आता काही वेळापुर्वीच रात्री ९:३० वाजता बिबट्या जुन्या सारसपुलापासुन ५०० मिटर ऊजवीकडे नाल्याजवळच दिसुन आल्याचे काही प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे.
केडगाव येथे दोन आठवड्यापूर्वी एका बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आल्यानंतर पुन्हा केडगाव मध्ये बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर वन विभागाने त्या ठिकाणी पिंजरे लावले असून केडगाव मध्ये पिंजरे लावल्यानंतर आता बिबट्याचे दर्शन थेट नगर शहराच्या मध्यवस्तीत होऊ लागले आहे .
सारसनगर आणि आयटीआय कॉलेज या भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सारसनगर भागात आणि पॉलिटेक्निकल कॉलेज जवळ बिबट्याचा दर्शन काही नागरिकांना झाल्याची माहिती आहे.तरी नागरिकांनी सतर्क रहावे बिबट्याला इजा होईल आणि तो चौतालेळ अशी कोणतीही कृती नागरिकांनी करू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे