शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू कोंडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
राजकारण हे समाजकारणाचे माध्यम – आमदार संग्राम जगताप
नगर : राजकारण हे समाजकारणाचे माध्यम असून युवकांनी पक्षाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्याचे काम करावे. जेणेकरून जनतेमध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून शासनाचा मिळालेला निधी जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. तरी पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या योजनांची माहिती जनतेला द्यावी पद हे शोभेचे नसून काम करण्यासाठी आहे. तरी नवनिर्वाचित कार्यकर्त्यांनी आपापल्या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून चांगले काम उभे करावे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
शिवसेनेचे उपशहर प्रमुख राजू कोंडके यांनी आपल्या सहकार्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले. शिवाजी नगर कल्याण रोड परिसरातील बाळासाहेब भोबळ यांची सामाजिक न्याय विभागाच्या नगर शहर उप अध्यक्ष पदी निवड करण्यात आली व गणेश नगर कल्याण रोड परिसरातील रुपेश लोखंडे यांची सामाजिक न्याय विभागाच्या नगर शहर सचिव पदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, सुरेश बनसोडे, युवराज शिंदे, अरिफ शेख, आदि उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांचे नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या निधी प्राप्त होत असून त्या माध्यमातून शहर विकासाला कधी प्राप्त झाली आहे. पदाधिकारी कार्यकर्ते यांनी देखील आपल्याला मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा कामाच्या माध्यमातून आपली चांगली ओळख निर्माण करावी चांगल्या कामासाठी आम्ही नेहमीच तुमच्याबरोबर आहोत असे ते म्हणाले.