दिवसाढवळ्या गोळीबार,संशयिताने झाडलेल्या दोन गोळ्यां…पाेलिस तपास सुरु.
भर दुपारच्या सुमारास गोळीबार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. प्राथमिक माहितीनूसार संशयिताने दोन गोळ्या झाडल्या. शिर्डी पाेलिस घटनास्थळी पाेहचले असून घटनेचा तपास सुरु आहे. शिर्डी शहरातील एका खासगी पार्किंगमध्ये दुपारच्या सुमारास गाेळीबाराची घटना घडली. संशयिताने झाडलेल्या दोन गोळ्यांपैकी एक गाेळी हॉटेलच्या खाेलीत घुसली. या घटनेनंतर संशयितांना घटनास्थळावरुन धूम ठाेकली. या घटनेनंतर संबंधित हाॅटेल परिसरात आणि शिर्डी शहरात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती समजताच शिर्डी पाेलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहितीनूसार या घटनेत कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. या घटनेचा तपास सुरू आहे. नेमका गोळीबार कुणी आणि का केला याबाबत तपास सूरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.