अहमदनगर शहरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर तब्बल 74 लाख रुपयांची रोकड जप्त… स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई…
अहमदनगर शहरातील खिस्तगली आणि मार्केट यार्ड परिसरात हवाला कार्यालयात छापेमारी गुजरातचे पाच जणांना ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून तब्बल 74 लाखांची रोकड पकडली ही रोकड हवेलीची असून या प्रकरणी गुजरातच्या पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पाच जणांची चौकशी सुरू होती. त्यानंतर त्यांना कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे एलसीबी काढून सांगण्यात आले. निवडणुकीचे धामधूम सुरू होताच शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली