आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो.च्या सभासदांसाठी रेट्रोफिटिंग टेक्निक विथ डिफरंट स्ट्रक्चरल आस्पेक्ट या विषयावर व्याख्यान संपन्न
रेट्रोफिटिंग या नव्याने विकसित तंत्रज्ञानाचा वापर नगर मधील बांधकाम व्यवसायाला वेगळी दिशा देणार – इंजि. अभिषेक कार्ले.
नगर : रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाची गरज, त्याचे प्रकार आणि पद्धती, आर सी सी स्ट्रक्चरची ताकद वाढवण्यासाठी या पद्धतीने लागणाऱ्या अभ्यास, यावरील विविध केस स्टडीज आणि रेट्रोफिटिंगचे फायदे यावर अभिषेक कार्ले यांनी विस्तृत मार्गदर्शन केले. एखादे जुने झालेले काम पुन्हा पाडून नवीन बांधण्याऐवजी या प्रकाराने आणखी काही वर्षे आपण त्या स्ट्रक्चरचा वापर करू शकतो. त्यामुळे खर्चात पुष्कळ बचत होते. रेट्रोफिटिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सर्व शास्त्रीय चाचण्या घेऊन योग्य अनुमान काढूनच त्यातील कोणत्या पद्धतीचा वापर करणे आवश्यक आहे हे ठरवले जाते. पुणे, मुंबई, नाशिक अश्या मोठ्या शहरांमध्ये हे तंत्रज्ञान विकसितपणे वापरले जात असून जुन्या इमारतींचे आयुष्य वाढविण्यासाठी तसेच हाय राइज बिल्डिंग मध्ये त्या इमारतीच्या वापरात बदल झाल्यास निश्चितच याचा उपयोग केला जाऊ शकतो. आपल्या शहरामध्ये आता याचे कंन्सल्टंट उपलब्ध झाले असून या तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकतो असे अभिषेक कार्ले यांनी सांगितले.
आर्किटेक्टस् इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर आणि पोलाद स्टील जालना यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे प्रॅक्टिस करणारे प्रतिथयश आर सी सी कन्सल्टंट अभिषेक कार्ले यांचे रेट्रोफिटिंग टेक्निक विथ डिफरंट स्ट्रक्चरल आस्पेक्ट या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोलाद स्टीलचे आदेश गुंगे, एसा अध्यक्ष रमेश कार्ले, प्रकाश जैन, रवींद्र चौधरी, एकनाथ जोशी, विशारद पेटकर, अशोक सातकर , सुनिल औटी, ऐश्वर्या कार्ले, प्रथमेश सोनावणे, प्रितेश पाटोळे, यश शहा, देवेंद्र पोतदार, विजय पादिर, अनिल धोकरीया, विजय मगर, नंदकुमार बेरड, विनोद काकडे आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांचा परिचय संचालक मयुरेश देशमुख यांनी करून दिला, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकेत पादिर यांनी केले तर उपस्थितांचे आभार सचिव प्रदिप तांदळे यांनी मानले.