गंगापुर येथे चार वर्षांच्या विद्यार्थ्यांला पळवुन नेणाऱ्या महिलेला नागरिकांनच्या सतर्कमुळे पकडून पोलिसांच्या दिले ताब्यात.
पालकांनो तुमच्या लहान मुलांना सांभाळा…
खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांला पळून घेवुन जाणाऱ्या महिलेला ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले असून शहरासह परिसरातील पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून ही महीला (वेडसर) भोळसर असल्याचे बोलले जात आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार २२ मार्च रोजी सकाळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात असलेल्या संस्कार इंग्लिश मीडियम शाळेतील कोबापुरचा शंकर कांतीलाल बैनाडे चार वर्षांच्या विद्यार्थ्यांला शाळेजवळ उचलून घेऊन गंगापूर ओलांडून जाताना अंजली पेट्रोल पंपाजवळ नातेवाईकांनी ओळखल्यामुळे मुलाला छत्रपती संभाजीनगर रोडवरील लक्ष्मी पत्रा स्टील दुकानासमोर नागरिकांनी वेडसर बाईला पकडल्याने पुढील अनर्थ टळला नागरिकांनी वेडसर बाईला पोलिसांच्या ताब्यात दिले सदरील बाई नवाबपुर येथील फाशीपारधी समाजाची आहे
ती वेडसर असल्याचे बोलले जात आहे. पोलिस निरीक्षक सत्यजीत ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहेत.
(प्रतिनिधीः विशाल जोशी गंगापूर)