धनराज कांबळे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड.
अहमदपूर शहरातील न्यू विद्या नगर काॅलनीत वास्तव्यास असलेले व मंत्रालयात बांधकाम विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असलेले धनराज मोहनराव कांबळे यांची पोलीस उप अधीक्षक म्हणून निवड झाली आहे. या बाबत सविस्तर वृत्त असे की धनराज कांबळे यांचे प्राथमिक शिक्षण तालुक्यातील अंधोरी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत झाले आहे.माध्यमिक शिक्षण शहरातील महात्मा फुले महाविद्यालयात तर अकरावी बारावीचे शिक्षण महात्मा गांधी महाविद्यालयात झाले असून पदवीचे शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात पूर्ण केले आहे. पदवी (बीएस्सी) पर्यंतचे शिक्षण घेऊन स्पर्धा परिक्षेची तयारी करण्यासाठी त्यांनी पुणे गाठले तेथे अतिशय मेहनत घेऊन त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयार केली. २०१८ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परिक्षेत ते यशस्वी होऊन मंत्रालयात बांधकाम विभागात सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) म्हणून ते कार्यरत आहेत पण यापेक्षा मोठ्या पदावर जाण्याची त्यांची इच्छा होती व त्यादृष्टीने कष्ट करण्याची तयारी असल्यामुळे त्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून २०२२ सालची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची त्यांनी परिक्षा दिली त्यात पोलीस उप अधीक्षक या पदी निवड झाली आहे. धनराज कांबळे यांचे वडील मोहनराव भीमसेन कांबळे हे संस्थेत माध्यमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते पण ते सध्या हयात नाहीत.आई मंगलताई मोहनराव कांबळे ह्यानी आरोग्य विभागातून स्वेच्छा निवृत्ती घेतली आहे.
News Today 24
विश्वनाथ हेगणे