लोकसभेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न.
सुजय विखेंच्या पाठिंब्यासाठी राष्ट्रवादीचा ४ एप्रिलला मेळावा
नगर – शहरात लोकसभेच्या पार्श्वभूमीवर नगर दक्षिण जिल्हा राष्ट्रवादी पक्षाची बैठक नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारा संदर्भात प्राथमिक चर्चा झाली तसेच प्रचाराचे नियोजन मतदार संघातील बैठका यांबाबत नियोजन केले. ४ एप्रिलला शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. महायुतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करेल तसेच उपमुख्यमंत्री व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सूचनेनुसार लोकसभा निवडणुकीची व्यूहरचना आखली जाईल असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगर दक्षिण लोकसभा महायुतीचे समन्वयक म्हणून आमदार संग्राम जगताप व दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून बाळासाहेब नाहटा यांची नियुक्ती केल्याबद्दल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, नगर उत्तरेचे जिल्हाध्यक्ष कपिल पाटील, दत्ता पानसरे, कार्याध्यक्ष संजय कोळगे, राज्य सरचिटणीस राजेंद्र गुंड, नगर शहर कार्याध्यक्ष अभिजीत खोसे, अजिंक्य बोरकर, वैभव ढाकणे, विजय सुंबे, संतोष ढाकणे, मळु गाडळकर संतोष लांडे निलेश बांगरे, सुरज जाधव, सागर गुंजाळ, जॉय लोखंडे, मोहन गुंजाळ, गणेश गोरे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.