उदयनराजे नगर केडगाव द्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण सोहळा वर्ष बारावे तपपूर्ती सोहळा उत्साहात संपन्न.
नगर : श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानने १२ वर्षांपूर्वी विश्वेश्वराचे मंदिर उभारले, हे मंदिर केडगाव परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान बनले. भाविक वर्ग मोठ्या संख्येने येथे दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी वर्षभर विविध धार्मिक आध्यत्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते त्या माध्यमातून समाज एकवटला जातो, या मंदिराला १२ वर्ष पूर्ण झाले असून त्या निमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण सोहळा संपन्न झाला, यात अनेक महारांजानी कीर्तनाच्या माध्यमातून आपले विचार मांडले.युवा पिढीला व्यसनांपासून दूर होण्याचा वडीलधाऱ्या माणसांचा मान सन्मान ठेवायचा महत्त्वाचा उपदेश या ठिकाणी सर्व महाराजांनी केला सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनात जगत असताना महारांजानी केलेल्या उपदेशाचे पावलोपावली गरज पडेल, सर्व महाराजांचे विचार हे नक्कीच आचरणात आणण्यासारखे होते असे श्री विश्वेश्वर प्रतिष्ठानचे महेश घोडके यांनी सांगितले. उदयनराजे नगर केडगाव द्वारा आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण सोहळा वर्ष बारावे तपपूर्ती सोहळा संपन्न झाला, हा तपपूर्ती सोहळा व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी केडगाव उपनगराचे आधारवड भानुदास कोतकर यांचे मोलाचे मार्गदर्शन सप्ताह कमिटीला लाभले. सप्ताहाची सुरुवात नगर आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली,त्याप्रसंगी त्यांचे ही मोलाचे मार्गदर्शन सप्ताह कमिटी ला भेटले. काकडा आरती नंतर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी व शिवलीलामृत पारायण वाचन व्हायचे. सायंकाळी खेळीमेळीच्या वातावरणात हरिपाठ व्हायचा यामध्ये परिसरातील महिला भगिनींचा मोठा सहभाग होता, त्यानंतर संध्याकाळी आठ ते दहा या वेळेत रोज वेगवेगळ्या महाराजांचे जाहीर हरिकीर्तन व्हायचे. हे सर्व कार्यक्रम व्यवस्थित रित्या पार पाडत असताना ज्यांनी हा कार्यक्रम चालू करण्यासाठी गणेश सातपुते यांच्याकडे सारखा अट्टाहास धरला, कै. सुभाष महाराज सूर्यवंशी, कै. पुरुषोत्तम महाराज शिंदे, कै. सुभाष महाराज धांडे यांना कधीही विसरता येणार नाही. या सप्ताहासाठी नियोजन ह.भ.प महेश महाराज मडके यांनी केले होते सप्ताहाच्या आठ दिवसांमध्ये उदयनराजे नगर, विश्वनराजे नगर, शिवाजीनगर, वैष्णव नगर, रभाजी नगर, एकनाथ नगर, राधाकृष्ण कॉलनी, श्रीकृष्ण नगर व मराठा नगर परिसरात एक प्रसन्न वातावरण तयार झाले होते. एक धार्मिक वातावरण तयार झाले होते.
!!!मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची परवा भी कुणाची!!!
खरच शब्दात सांगता येणार नाही असं कार्य या कार्यक्रमाचे निमित्ताने त्यांच्या हातून या ठिकाणी होत आहे. होत असलेल्या सप्ताह हा एक नवीन वसाहतीमध्ये होत आहे ज्यामध्ये मागील पाच ते सहा वर्षात बरीच बाहेर गावची लोक नोकरी किंवा व्यवसाय किंवा छोट्या-मोठ्या कामानिमित्त या ठिकाणी येऊन राहिली त्यांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन हा सप्ताह चा तपपूर्ती सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला हा कार्यक्रम पार पडत असताना भाऊंना नक्कीच मोठे भाऊ सचिन सातपुते लहान भाऊ सागर सातपुते यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. आई व वडिलांचा आशीर्वाद तर त्यांच्या कायम सोबत आहे त्यामुळे एवढे मोठे कार्य करण्यासाठी त्यांना मोठे बळ हे घरातूनच मिळाले आता विषय येतो की या माणसाला घरचे चार पाच प्रकारचे व्यवसाय असताना मग त्यात दूध व्यवसाय असेल विटभट्टी असेल कंस्ट्रक्शन ची एखादी साईट चालू असेल एवढं सगळी पाठीमागे कामे असताना आठ दिवस या सर्व रोजचे कामे मागे ठेऊन या माणसाने खऱ्या अर्थाने एक सामाजिक कार्य, धार्मिक कार्य त्यांनी केलेल आहे याचा मला मोठा अभिमान आहे. आणि या कार्यक्रमात आम्ही लहान मोठे विसरून त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो मग समाजासाठी कोणतेही अपेक्षा न ठेवता रात्रंदिवस जो माणूस निस्वार्थपणे कार्य करतो मग ते सार्वजनिक असो वैयक्तिक असो एखाद्याच्या सुखाचे असो किंवा दुःखाचे असो फक्त गणेश सातपुते यांना माहित होईपर्यंत उशीर आहे लगेच माणूस स्वतः त्या ठिकाणी हजर आहे माझा सांगण्याचा सार्थ हेतू एवढाच आहे की जसे आपण आठ दिवस सर्व विचार विनिमय करून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला तसेच येणाऱ्या काळात मागील काही हेवे देवे असतील किंवा कुणाचे काही गैरसमज असतील ते बाजूला ठेवून मागे झालेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेऊन मोठ्या ताकतीने आपल्या परिसरातील सर्व मंडळी त्यांच्या मागे उभे राहतील व पुढील येणाऱ्या काळात त्यांना अजून काम करण्याची मोठी संधी द्याल अशी या निमित्ताने अशा व्यक्त करतो आणि थांबतो.
या विश्वेश्वर सप्ताहाच्या तपपूर्ती कार्यक्रमानिमित्त चे लहान थोर, वडीलधारी मंडळी, माता भगिनी यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत या ठिकाणी केली त्यांचे सर्वांचे मी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश सातपुते यांच्यावतीने शतशः आभार मानतो.