Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»अहमदनगर ब्रेकिंग : गळफास घेऊन एकाची आत्महत्या, आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन महीलांन विरुद्ध गुन्हा दाखल
    Ahmednagar

    अहमदनगर ब्रेकिंग : गळफास घेऊन एकाची आत्महत्या, आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन महीलांन विरुद्ध गुन्हा दाखल

    newstoday24By newstoday24March 25, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर ब्रेकिंग : गळफास घेऊन एकाची आत्महत्या, आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन महीलांन विरुद्ध गुन्हा दाखल

    जामखेड तालुका प्रतिनिधी ( समीर शेख जामखेड)

    बसमध्ये बसवुन दिल्यानंतर हरवलेल्या भावास सापडुन दे नाहीतर तुझ्याकडे पाहून घेतो आसे म्हणुन धमकावल्याने या त्रासाला कंटाळून एकाने पाडळी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या प्रकरणी ज्ञानेश्वर शंकर साळवे, वय ४० वर्षे रा. राजनगर मुकुंदवाडी ता. जिल्हा. छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी महीला रेखा सुनील खिल्लारे व सारीका प्रदिप सरदार दोन्ही.रा ता. जिल्हा, छत्रपती संभाजीनगर अशा दोन महीला विरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की या घटनेतील हरवलेली व्यक्ती व गळफास घेऊन आत्महत्या केलेली व्यक्ती हे कुसडगाव परीसरात रंगकाम करण्यासाठी आले होते. यातील आरोपी महीलेचा भाऊ राजरतन वसंतराव अवसरमोल हा काही दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. यातिल मयत प्रेमचंद उर्फ प्रेम शंकर साळवे वय ४५ वर्षे याने आरोपीच्या भावास छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी एस टी बस मध्ये बसवुन दिले होते. मात्र तेंव्हा पासून त्यांचा भाऊ राजरतन अवसरमोल हा बेपत्ता झाला होता. त्यामुळे आरोपी महीला या मयत याच्यावर तु आमचा भाऊ सापडुन दे नाहीतर आम्ही तुझ्याकडे पाहुन घेऊ आसे म्हणुन दम दिला. यामुळे त्यांच्या त्रासाला कंटाळून आखेर मयत प्रेमचंद उर्फ प्रेम शंकर साळवे वय ४५ वर्षे याने दि २४ मार्च रोजी दुपारी जामखेड तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

    या प्रकरणी मयताच्या नातेवाईकांनी वरील आरोपी हे मयत प्रेमचंद उर्फ प्रेम साळवे यांच्या आत्महतेस कारणीभूत आसल्याने संबंधित धमकी देणार्‍या दोन्ही महीलान विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महतेस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संतोष पगारे हे करत आहेत.

    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleभवानीनगर येथील श्री महादेव मंदिरात मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाअभिषेक,महाआरती व महाप्रसादाचे वाटप संपन्न .
    Next Article पाथर्डी तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारणी जाहीर
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.