भवानीनगर येथील श्री महादेव मंदिरात मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त महाअभिषेक,महाआरती व महाप्रसादाचे वाटप संपन्न .
नगर : मार्केट यार्ड भवानीनगर येथील श्री महादेव मंदिरात मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने महाअभिषेक, महाआरती संपन्न झाली. यावेळी मा.उपमहापौर गणेश भोसले,मा.नगरसेवक प्रकाश भागानगरे, मर्चंट बँकेचे मा,चेअरमन संजय चोपडा, मा.नगरसेवक ज्ञानेश्वर रासकर, प्रकाश कराळे, धर्मा करांडे,सागर गुंजाळ, संतोष ढाकणे, मळू गाडळकर, छबुराव कांडेकर, बाप्पू ओहोळ, आदींसह नागरिक उपस्थित होते.
मा.नगरसेवक प्रकाश भागानगरे म्हणाले की मा.आ.अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त श्री महादेव मंदिरामध्ये महाअभिषेक,महाआरती करण्यात आली असून भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. तसेच मा.आ.अरुणकाका जगताप यांना दीर्घ आयुष्य लाभो व समाजाची सेवा घडो यावेळी प्रार्थना ही करण्यात आली असे ते म्हणाले.