भाजपच्या वतीने मार्केट यार्ड येथील छ. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास अभिवादन
छ.शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना आजही सुरु – अक्षय कर्डिले
नगर : छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वांना बरोबर घेऊन रयतेचे राज्य निर्माण केले. शेतकऱ्यांसाठी विविध योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत आजही त्या सुरू आहेत, मार्केट यार्ड आवारातील भव्यदिव्य असा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभा असून या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांना प्रेरणा मिळेल अशी प्रतिपादन भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांनी केले.
मार्केट यार्ड येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शिवजयंती निमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या समवेत भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, भाजप लोकसभा प्रमुख माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सुळ, संचालक हरिभाऊ कर्डिले, सुधीर भापकर संतोष म्हस्के, आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते.
भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास समाजाला प्रेरणा देत असून आजच्या युवा पिढीसाठी आदर्श आहे असे ते म्हणाले.