मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बॉलिूड अभिनेता गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश.
सरकारच्या विकासकामांनी प्रभावित होत गोविंदाची शिवसेना शिंदे गटाला साथ
शिवसेना शिंदे गटाचा स्टार प्रचारक म्हणून गोविंदा निवडणुकीत प्रचार करणार.
बॉलिवुडचा अभिनेता गोविंदा आहूजा याने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे मुंबईतील पक्ष कार्यालय बाळासाहेब भवन येथे पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे फडणवीस पवार सरकारच्या विकास कामांवर प्रभावित होऊन गोविंदा पक्षात आलेले आहेत. सरकारची कामे गोविंदा जनतेपर्यंत पोहोचवतील. ज्यातून महायुतीला फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, शिवजयंतीच्या पवित्र दिनी सगळ्यांचे लाडके अभिनेते गोविंदा जी यांचे शिवसेनेत मनापासून स्वागत करतो. सगळ्याच समाजात ते लोकप्रिय असून विनम्र असलेले गोविंदा जी यांचे शिवसेना पक्षात स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो.
गोविंदा यांनी मुंबईतील सकारात्मक बदलांबाबत समाधान व्यक्त केले. सर्वच क्षेत्रात एक सकारात्मकता आणि समृद्धी दिसून येत आहे. मुंबईतील विकास कामांनी प्रभावित होऊन ते आपल्या सोबत आले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेअभिनेता गोविंदा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. ते पुढे म्हणाले की आजच्या दिवशी शिवसेना पक्षात प्रवेश करणे ही देवाची कृपा आहे. मी २००९ मध्ये राजकरणातून बाहेर पडलो होतो. १४ वर्षांच्या वनवासानंतर पुन्हा सुरुवात करताना रामराज्य जिथे आहे त्याच पक्षात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कृपेने आलो आहे अशी भावना गोविंदा यांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई.