आगामी लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर यवतमाळात पोलिसांची रंगीत तालीम.
यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणूक आणि सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांनी रुटमार्च तसेच दंगाकाबू योजनेची रंगीत तालीम केली.
पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ बैसाने,शहरचे ठाणेदार सतिश चवरे, अवधूतवाडीचे ठाणेदार नरेश रणधीर, लोहारा ठाणेदार यशोधरा मुनेश्वरसह सहा अधिकारी, ३९ कर्मचारी, सीआयसीएफचे दोन अधिकारी व ४० कर्मचारी, एसआरपीएफचे एक अधिकारी व २२ कर्मचारी, सीआरोचे एक अधिकारी, आरसीपी पथक २६ कर्मचारी, होमगार्ड २७ असे एकूण
१४ अधिकारी व १५४ कर्मचारी होते. प्रथम महात्मा फुले चौक येथे दंगाकाबू योजना राबविण्यात आली. त्यानंतर महात्मा फुले चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, मेन लाइन, टांगा चौक, सुवालाल चौक, गुजरी चौक, कळंब चौक, शारदा चौक, वंदेमातरम चौक, फुट मार्केट, जाजू चौक, दत्त चौकापर्यंत रुटमार्च काढला.