Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Breaking»रेती घाटावर रस्ता वादातुन रेती माफीयाचे दोन गटात गोळीबार : महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साकुर,भोसा येथील घटना
    Breaking

    रेती घाटावर रस्ता वादातुन रेती माफीयाचे दोन गटात गोळीबार : महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साकुर,भोसा येथील घटना

    newstoday24By newstoday24March 30, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रेती घाटावर रस्ता वादातुन रेती माफीयाचे दोन गटात गोळीबार : महागाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साकुर,भोसा येथील घटना

    अंजुमलाला सह 25 जणाविरुद्ध गुन्हे दाखल,महागाव पोलीसांत 4 जण अटकेत

    ” महागाव तालुका आणि आर्णी तालुक्याचे सीमेवर पैनगंगा नदी पत्रात रेतीच्या कारणावरुन दोन गटात गोळीबार, 25 जणाविरुद्ध गुन्हे दाखल, महागाव पोलीसांत 4 जण अटकेत.”

    पैनगंगा नदी पात्रात रेतीसाठी रस्त्याचे वादातून दोन गटात झालेल्या वादातून चक्क गोळीबार केल्याची घटना महागाव तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या भोसा पैनगंगा नदी पत्रात गुरुवारी रात्री 10.30 वाजता दरम्यान घडली. या प्रकरणी महागाव पोलिसांनी 25 जणाविरुद्ध गुन्हे दाखल करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 जणांना अटक केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
    दि.28/03/2024 रोजीचे 10/00 वा ते 10/20 वा चे दरम्याण अंजुमलाला वय अंदाजे 40 वर्ष तसेच त्याचे 20 ते 25 साथीदारांनी तिन गाड्यांमध्ये ग्राम भोसा येथील पैनगंगा नदीने पात्रावरील रेती घाटावर येवुन रेती वाहतुकीचे रस्त्यावरुण वाद करुण शिवीगाळ करित हात बुक्यांनी मारहान करुण तसेच फिर्यादिचे दिशेने काही पिस्टल मधुन गोळ्या झाडुन तसेच गोटमार करुण फिर्यादी व फिर्यादी सोबतच्या असलेल्या लोकांचा जिवानीशी ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. करिता अंजुमलाला वय अंदाजे 40 वर्ष रा. बोरी ता. पुसद जि. यवतमाळ याचे तसेच त्याचे साथीदारविरुद्ध कायदेशीर कार्यवाही व्हावी सुरेश पुंडलिकराव ढाले यांनी पोलीस स्टेशन महागाव येथे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी 25 जणाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे. तर 4 जणांना अटक केली आहे. घटनास्थळावरून 2 जिवंत काडतुस आणि 4 रिकामे काडतुस जप्त करण्यात आले असल्याचे समजते.
    पैनगंगा नदी पत्रात रेती तस्करा मध्ये जुन्या वादातून रस्त्याच्या कारणावरुन वाद झाला अन् या वादातून दोन गटांत गोळीबार झाला. यात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. घटनेची माहीती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाली होती हे विशेष. या घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस करत आहे.

    अजित महिंद्रे महागाव यवतमाळ

    #Breaking #Update #News #Crime #Polie
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleछत्रपती शिवाजी महाराजांनी महिलांना समाजात मानाचे स्थान व प्रगती व्हावी यासाठी विशेष असे कार्य केले – आ.संग्राम जगताप
    Next Article भीमशक्ती संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक सुरू.
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.