भीमशक्ती संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक सुरू.
मुंबईतील भीमशक्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ऑनलाईन संबंधित केले.
सविधान व भाईचारा संपवू पाहणाऱ्या भाजपला हरवण्यासाठी एकजूट महत्वाची चेन्नीथला
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भीमशक्ती संघटनेच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक मुंबईच्या चेंबूर येथील ग्रँड नालंदा हॉल येथे आज सकाळी दहा वाजेपासून सुरू झाली असून या बैठकीला भीमशक्ती संघटनेचे प्रमुख तथा काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. भीमशक्ती संघटनेच्या या बैठकीला आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ऑनलाईन संबोधित केले चेन्नीथला म्हणाले देशातील संविधान व भाईचारा संपवण्यासाठी भाजप मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. भाजपचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भीमशक्ती सारख्या संघटनांनी पुढे यावे तसेच राज्यातील महाविकास आघाडी व काँग्रेसला मजबूत करण्यासाठी भिम शक्तीच्या कार्यकर्त्यांनी आपले योगदान द्यावे केंद्रातील भाजपला हरवण्यासाठी आपली एकजूट महत्वाची असल्याचे यावेळी रमेश चेन्नीथला म्हणाले.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई.