मुंबई विमानळावर 11 किलो सोने जप्त महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई.
तब्बल 6.30 कोटी रुपये किमतीचे 10.68 किलो सोने तस्करी रोखण्यात यश.
27 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील महसूल गुप्तचर संचालनालय कक्ष 3 ने 6.30 कोटी रुपये किंमतीच्या 10.68 किलो सोन्याची तस्करी विमानतळावर रोखली असून या प्रकरणी विमानतळावर 22 वेगवेगळ्या प्रकरणात प्रवासी यांनी चेक इन बॅग, इलेक्ट्रॉनिक वस्तू, विविध सौंदर्य प्रसाधने, विदेशी चलन ,अंगावरील कपडे, शरीरातील पोकळी मध्ये सदरचा किमती ऐवज लपवुन विमानतळावरून तस्करी केली जात होती ती मुंबई विमानतळ महसूल विभागाच्या पथक क्रमांक 3 ने मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर पकडली आहे. अधिक तपास मुंबई विमानतळ महसूल गुप्तचर संचालनालय कक्ष तीन करत आहे.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई