शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशीची चोरी : सिसी कॅमेरऱ्यात कैद : आठ दिवसात मुद्देमालासह चोर जेरबंद.
अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथील शेतकऱ्याच्या गोठयातील दोन म्हशी व एक वासरू चोरून नेतांना चोर सिसि कॅमेऱ्यात कैद मुळे पोलीसांनी तपास करत आठ दिवसात मुद्देमालासह चोर जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले.
सविस्तर माहिती आशी की, फिर्यादी गणेश मन्नमथ स्वामी व्यवसाय शेती रा किनगाव यांच्या शेतातील गोठया मध्ये एक मुर्हा जातीची म्हैस वय ६ वर्ष तीचे एक वासरू किमत ६०,००० रुपये, एक भेरड जाफरा म्हैस वय ७ वर्ष तिची किमत ५०,००० रूपये मिळून अंदाजे एकून १,१०,००० रूपयाचा माल दि.२२.०३.२०२४ रोजी रात्री २०.०० ते दि २३.०३.२०२४ रोजीचे ०६.०० वाजण्याचे दरम्यान शेतातील गोठयातून बोलेरो पीकअपमधून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता हा सर्व प्रकार सिसि कॅमेरात कैद झाला होता या सिसि कॅमेऱ्याच्या फुटेज आधार घेत किनगाव पोलीसांनी बोलोरो पिकअप दोन म्हसी व वासरू तेलगंणा राज्यातील निजामाबाद जिल्हयातील साटापूर येथील जनावरांच्या बाजारत विक्री करतांना आरोपी वामन शामराव गरसूळे वय २४ वर्षे रा बहादुरपूरा ता कंधार जि नांदेड, करण उर्फ अर्जुन शिवाजी राशीवंत वय १९ वर्षे रा. रामरहीम नगर मुखेड रोड ता कंधार जि नांदेड यांना दि २९.०३.२०२४ रोजी रात्री १०.०० वाजता किनगाव पोलीसांनी मुद्देमालासह आठ दिवसात तापास लावून ताब्यात घेतले असून सपोनि भाऊसाहेब खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन तोटेवाड,पोलीस हवलदार सुग्रीव देवळे,होमगार्ड नामदेव बरुरे,आनंद डोंगरे, दत्तात्रय कोंडमगिरे,देवानंद दहीफळे आदीने चांगली कामगीरी बजावली त्याबदल शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
News today 24 असलम शेख लातूर