दानवेनी भरवला खैरे यांच्या निवासस्थानी जाऊन पेढा : दानवे आणि खैरे याची अखेर युती
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील वादावर अखेर पडदा पडला आहे.
कारण रविवारी अंबादास दानवे यांनी चंद्रकांत खैरे यांची थेट त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली एवढेच नव्हे तर दानवेंनी खैरे यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देखील दिल्या आहे.
दानवे म्हणाले, ”संघटना महत्वाची असते हे आमचे विचार आहेत. संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे पक्षाकडून इथे जो उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करणे हे माझे कर्तव्य आहे. आम्ही सर्व मिळून ताकदीने काम करू. नाराजी ही उमेदवारी जाहीर होईपर्यंत असते. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होते त्या दिवशी नाराजी संपलेली असते. आम्ही उद्धव ठाकरेंना दोघांपैकी एकाला उमेदवारी द्या हे सांगितले होते”
यावेळी दोन्ही नेत्यांनी हसतखेळत एकमेकांशी संवाद साधला. तसेच एकमेकांना पेढा भरवत आपल्यातील वाद संपल्याचा संदेश दिला आहे. यावेळी खैरे म्हणाले, ”पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आम्हा दोघांशी संवाद साधला. तुम्ही दोघे माझे खंबीर नेते आहात, आपापसात वाद का घालता असे ते म्हणाले. त्यानंतर आम्ही दोघे एकत्र आलो, आम्ही चर्चा केली. त्याच चर्चेचा परिणाम ही भेट आहे”, असे खैरे म्हणाले.
(प्रतिनिधीःविशाल जोशी छत्रपती संभाजीनगर)