निराधाराचा अंतिम संस्कार करत घडवले माणुसकीचे दर्शन
शहर पोलीस स्टेशन कारंजा नगरपरिषद कारंजा श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रमेश देशमुख
दिनांक 31मार्च रोजी समृध्दी महामार्ग वर एक अनोळखी बेवारस व्यक्तीचा मृतदेह रोडच्या खालच्या बाजूला गवताळ भागात आढळून आला. बेवारस मृत्यू असल्यामुळे पत्रकार किरण क्षार व रमेश देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशन कारंजा व ग्रामीण पोलीस स्टेशन यांना माहिती देण्यात आली. ही हद्द शहर पोलीस स्टेशन मध्ये येत असल्यामुळे हा तपास कारंजा शहर पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला. बेवारस मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता.त्या मृतदेहाला कारंजा उपजिल्हा रुग्णालय आणले . परंतु त्या मृतदेहाची ओळख न पटल्याने ही माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार शुक्ला यांना देण्यात आली.त्यावेळी त्यांनी पी एस आय द्वारका अंभोरे मॅडम ऐ एस आय मुरलीधर उगले पोलीस कॉन्स्टेबल भारत राठोड पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर ढोरे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मृतदेहाचा पंचनामा केला. तेथील वैद्यकीय अधिकारी श्यामसुंदर सर यांनी त्यावेळी पोस्टमार्टम केले व मृतदेह अत्यंत कुजल्या अवस्थेत असल्यामुळे त्याच्या अंत्यविधी करणे अत्यंत आवश्यक होते. शहर पोलीस स्टेशन कारंजा व श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख व कारंजा नगर परिषद आरोग्य निरीक्षक राहुल सावंत कर्मचारी यांनी पुढाकार घेत त्या बेवारस मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. आणि माणुसकीचे दर्शन घडवले. त्यावेळी कारंजा शहर पोलीस स्टेशन च्या पीएसआय द्वारका अंभोरे मॅडम, ऐ एस आय मुरलीधर उगले , व पो कॉ भारत राठोड,पोलीस कॉन्स्टेबल डिगांबर ढोरे ,होमगार्ड मेहबूब शेख पोलीस मित्र शाहरुख खान ,पोलीस मित्र अहेफस खान ,नईन वाघमारे नगरपरिषद कर्मचारी खुशाल खंडारे हेमंत मेहरुलिया आनंद सारवान रत्नदीप खंडारे ओम प्रकाश शिंदे महाराज त्यांनी त्या बेवारस मृतदेहाचा अंतिम संस्कार हिंदू स्मशानभूमी बायपास येथे केला.
प्रतिनिधी सुनील फुलारी कारंजा लाड
जिल्हा वाशिम