Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»आनंदधाम भक्तनिवास येथील दंत चिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद
    Ahmednagar

    आनंदधाम भक्तनिवास येथील दंत चिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद

    newstoday24By newstoday24April 1, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवीन उपचार पध्दतीने रूग्णांना दिलासा देण्याचे काम कौतुकास्पद : आ.संग्राम जगताप

    आनंदधाम भक्तनिवास येथील दंत चिकित्सा शिबिराला मोठा प्रतिसाद

    नगर: दाताचे दुखणं हे खूप वेदनादायी असते. खराब झालेले, किडलेले दात वेळीच काढले नाही तर वेदना आणखी वाढतात. आचार्य श्रींच्या पुण्यस्मृतीनिमित्त आयोजित दंत चिकित्सा शिबीरात दात वेदनाविरहित पद्धतीने काढण्यात येत असल्याने रुग्णांना लाभ होत आहे. वेदना मुक्त करणारी सेवा हीच साधूसंतांना अभिप्रेत अशी सेवा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि नवनवीन उपचार पद्धतीचा अवलंब करून रूग्णांना दिलासा देण्याचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
    आचार्य सम्राट पूज्य आनंदऋषीजी म.सा. यांचा 32 वा स्मृतिदिन,  आनंदधाम फौंडेशनची 4 थी वर्षपूर्ती आणि नगरच्या सामूहिक विवाहाचे प्रणेते स्व. मुकनदासजी दुगड यांच्या 36 व्या स्मृतीदिनानिमित्त आनंदधाम भक्त निवास येथे आयोजित दंत चिकित्सा शिबीराचे उद्घाटन प्रेमलता दुगड यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी म.सा., प्रबुद्ध विचारक पूज्य आदर्शऋषीजी महाराज, पूज्य आलोकऋषीजी महाराज, महासतीजी पूज्य अर्चनाजी म.सा., पूज्य विश्वदर्शनाजी म.सा., पूज्य प्रणवदर्शनाजी म.सा. यांनी मांगलिक दिली.
    याप्रसंगी आ.संग्राम जगताप, बडीसाजन श्री संघाचे अध्यक्ष पेमराज बोथरा, राजेंद्र बोथरा, गोपाल मणियार, माजी उपमहापौर गणेश भोसले, अरूण दुगड, अनिल दुगड, माजी नगरसेवक संजय चोपडा, प्रकाश भागानगरे, सी.ए., आयपी अजय मुथा, राजेंद्र ताथेड, विजय बिनायके, सीमा दुगड, मनिष दुगड, किशोर ताथेड, संजीवनी ताथेड, विशाखा दुगड, अंकिता कटारिया, कियांश दुगड, पनालाल बोरा, बाळू कांकरिया, तज्ज्ञ डॉ. सरोज जोशी (राजकोट), डॉ. श्रेणिक नहाटा आदींसह आनंदधाम फौंडेशनचे सदस्य  उपस्थित होते.
    डोक्यावर हात आणि हातात दात अशा उपचारांसाठी  प्रसिद्ध असलेल्या डॉ. जोशी यांच्या उपचार पद्धतीने रूग्णांचे दात काढण्यात आले. हलणारे, किडलेले, खराब झालेले कोणतेही दात भूल न देता काढण्यात आले. दात काढताना कोणतीही वेदना अथवा रक्तस्राव होत नाही. त्यामुळे रूग्णांना कमी कमी वेळेत खराब, दुखऱ्या दातापासून सुटका मिळते. डायबेटिक, हृदयरोग असलेल्या रूग्णांचे दातही योग्य काळजी घेऊन काढण्यात आले. अनिल दुगड यांनी स्वागत केले. प्रविण मुनोत यांनी आभार मानले. तब्बल 444 रूग्णांनी दोन दिवसीय शिबिराचा लाभ घेतला.

    #Ahmednagar #Breaking #News
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सभासदांना वैद्यकीय मदत .
    Next Article निराधाराचा अंतिम संस्कार करत घडवले माणुसकीचे दर्शन
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.