लातूर लोकसभेचे उमेदवार लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ अहमदपूर तालुक्यातील बूथ प्रमुख,शक्ती केंद्र प्रमुख,सुपर वारियर्सची बैठक संपन्न.
लातूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार लोकप्रिय खासदार सुधाकरराव श्रृगांरे यांच्या प्रचारार्थ 236 विधानसभा मतदारसंघातील अहमदपूर तालुक्यातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, सुपर वारीयर्सची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच संपन्न झाली.
भारतीय जनता पक्षाचे मराठवाड्याचे संघटन मंत्री संजयभाऊ कौडगे,भाजपाचे प्रदेश सचिव तथा लोकसभा प्रभारी प्रा. किरणजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे,जिल्हा सरचिटणीस अॅड भारत भाऊ चामे,किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष माजी सभापतीअशोक काका केंद्रे, माजी जिल्हा परिषद सदस्य त्र्यंबक आबा गुट्टे,लोकसभा विस्तारक सिध्देश्वर पवार,तालुका विस्तारक चंद्रशेखर डांगे,ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव ज्ञानोबा बडगिरे,राजकुमार मजगे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष अमोल निडवदे,भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी,तालुका अध्यक्ष प्रताप पाटील,शहर अध्यक्ष सुशांत गुनाले,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामानंद मुंढे,जिल्हाउपाध्यक्ष ओम पुणे,प्रदेश सदस्य बाळासाहेब होळकर,डॉ.सिध्दार्थ सुर्यवंशी, प्रदेश निमंत्रित सदस्य दत्तात्रय जमालपुरे, अनुसूचित जाती मोर्चा चे तालुका अध्यक्ष रामनाथ पलमटे,ओबीचे मोर्चाचे तालुका अध्यक्ष दत्ता खंदाडे,महिला मोर्चा तालुका अध्यक्ष जयश्री केंद्रे,महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा पुष्पाताई तेलंग,जिल्हा सरचिटणीस बेंबळगे प्रणिता,शर्मा ताई यांच्या सह अहमदपूर तालुक्यातील बूथ प्रमुख,शक्ती केंन्द्र प्रमुख व सुपर वारियर्स यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीचे प्रास्ताविक भाजपाचे तालुका अध्यक्ष प्रताप पाटील यांनी केले तर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी यांनी बैठकीचे सुत्रसंचालन करून आभार मानले. राष्ट्रगीताने बैठकीची सांगता करण्यात आली.
News today 24 असलम शेख लातुर,