खासदार राहुल शेवाळे यांनी उभारली धारावी पुनर्विकासाची गुढी
धारावीकरांनी आयोजित केलेल्या सोहळ्यात खासदार राहुल शेवाळे यांनी केली सपत्नीक गुढीची पूजा
उपस्थितांनी केला धारावी पुनर्विकासाचा संकल्प
हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर धारावीतील जय बजरंग मित्र मंडळाने ‘ धारावी विकासाची ‘ गुढी उभारून अनोखा सोहळा साजरा केला. मुंबई दक्षिण मध्यचे शिवसेना शिंदे गट महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी या सोहळ्याला उपस्थित राहून धारावी पुनर्विकासाच्या प्रतिकात्मक देखाव्यावर उभारण्यात आलेल्या विकासाच्या गुढीची सपत्नीक पूजा केली. या सोहळ्याला खासदार राहुल शेवाळे यांच्यासह सौ कामिनी राहुल शेवाळे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश शिरवाडकर, विलास आंबेकर शिवसेनेचे विधानसभा प्रमुख प्रवीण जैन, मनोहर रायबागे, अन्य मान्यवर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक रहिवाशी पारंपारिक पोशाखात उपस्थित होते.
धारावीच्या खंबादेव परिसरात जय बजरंगबली मित्र मंडळ आणि धारावी पुनर्विकास समन्वय समितच्या वतीने धारावी पुनर्विकासाची गुढी या संकल्पनेवर आधारीत गुढीपाडव्याचे आयोजन केले होते.महाराष्ट्राची समृध्द परंपरा दाखविणारा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तसेच धारावी पुनर्विकासाच्या गुढीची पूजा करण्यात आली .धारावीतील गुढी पाडव्यात धारावी पुनर्विकासाचा प्रातिनिधिक देखावा उभारण्यात आला होता. धारावी पुनर्विकास दाखविणारी एक गगनचुंबी इमारत आणि त्यावर गुढी उभारण्यात आली होती. या देखव्याने सगळ्यांचे लक्ष वेधले विकासाच्या या गुढीपाडव्याला महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्यासह सगळ्यांनी धारावी पुनर्विकासाचा संकल्प केला.
प्रतिनिधी अनुभव भागवत मुंबई.