Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Blog»चोरी प्रकरणातील फरार आरोपी २१ वर्षानंतर पोलीसांनी मुसक्या आवळल्या.
    Blog

    चोरी प्रकरणातील फरार आरोपी २१ वर्षानंतर पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

    newstoday24By newstoday24April 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोरी प्रकरणातील फरार आरोपी २१ वर्षानंतर पोलीसांनी मुसक्या आवळल्या.

    अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे पती- पत्नीस धारदार शस्त्राने जखमी करुन सात ग्रॅम सोन्याचे दागिने चोरी प्रकरणातील फरार आरोपी २१ वर्षांनंतर पोलीसांनी मुसक्या आवळल्या असून तिन दिवसाचा कोर्टाकडून पिसीआर घेतला आहे.

    सविस्तर वृत असे की अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे सटवाजी मरीबा सूर्यवंशी (वय ७०) व त्यांच्या पत्नी शालुबाई सुर्यवंशी या दोघांना २२ सप्टेंबर २००३ च्या रात्री धारदार शस्त्राने जखमी करून शालुबाई यांच्या गळ्यातील मनी मंगळसूत्र व सेवन पीस असे सात ग्रॅम सोने जबरदस्तीने चोरून नेले होते. या प्रकरणी सटवाजी सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन किनगाव गुन्हा नोंद होता.गुन्हयातील आरोपी पांडुरंग मरीबा नामपल्ले (रा. हिप्परगा चिटली, ता. लोहा) हा तेव्हापासून फरार होता. तो आपल्या कुटुंबासह मिळेल ते मजुरी, बांधकाम असे विविध काम करत गावोगाव फिरत होता.

    पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, आरोपी हा नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे वास्तव्यास आहे. माहिती मिळताच किनगाव पोलिसांनी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी मनीष कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांनी एक पथक नेमले. या पथकात पोना. काळे, पोकॉ. सुनील श्रीरामे यांनी पाच दिवस सातत्याने आरोपीवर पाळत ठेवत पकडून अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रामचंद्र गोखरे करीत आहेत.

    News today 24 असलम शेख लातुर,

    #Breaking #Update #News #Crime #Police
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे शांतता बैठकीचे आयोजन.
    Next Article खासदार राहुल शेवाळे यांनी उभारली धारावी पुनर्विकासाची गुढी
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025

    नगर ब्रेकिंग : धडा वेगळ मुंडके,एक पाय बाजूला अनोळखी तरुणाच्या खुनाचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला उलगडा 

    March 16, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.