अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे शांतता बैठकीचे आयोजन.
अहमदपुर तालुक्यातील किनगाव येथे पोलीस स्टेशनमध्ये शांतता बैठक घेण्यात आली. यावर्षी रमजान ईद, रामनवमी , आंबेडकर जयंती हे तीन सन एकत्रित आले असून गावात हे सन शांततेत साजरे करावेत म्हणून आज दि.८/०४/२०२४,सोमवारी सकाळी ११ वाजता शांतता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्त सपोनि भाऊसाहेब खंदारे यांनी रमजान ईद, रामनवमी,आंबेडकर जयंती सन उत्साहात व शांततेत साजरे करण्याचे आवाहन केले त्यात लोकसभेच्या निवडणुका असून आचारसंहितेचा भंग करू नये, नियमानुसार १० वाजेपर्यंत वादय ढोल , बैन्ड वाजविण्याची परवानगी आहे , डिजेचे परिणाम समाजात तेड निर्माण करून अनुचित प्रकार घडवितात व शरिर मनावर परिणाम करतात तेंव्हा डिजे सारखे वादय वाजवू नये , येथे विविध जाती धर्माचे लोक गुन्या गोविंदाने रहातात त्यात कांही मंडळी स्वतःचा हेतू साध्य करण्यासाठी वाईट प्रकार घडविण्यासाठी प्रयत्न करत असतात आशा लोका पासून सावाध राहीले पाहिजे असे मार्गदर्शन केले.
यावेळी माजि जि.प सदस्य त्र्यंबक गुट्टे, सरपंच सुमित्राबाई वाहुळे, उपसरपंच विठ्ठलराव बोडके,ग्राम विकास अधिकारी आर.जि.कांबळे , लिपीक मेघराज चावरे, सपोनि भाऊसाहेब खंदारे, पोलीस उपनिरक्षक गोखरे, पोहेकॉ कल्याणे, मुरुळे, महाके व परिसरातील पोलीस पाटील, रामनवमी उत्सव समिती पदाधिकारी , डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीचे पदाधिकारी, रमजान ईद साजरी करण्याच्या निमित्ताने मुस्लीम बांधव आदीजन उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,