लातूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरराव शृंगारे यांचा लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघ परिसरात झंझावात.
लातूर लोकसभा मतदारसंघ अंतर्गत लोहा – कंधार विधानसभेतील माळाकोळी शहरात बारा ज्योतिर्लिंग देवस्थान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सादर नमन, लोहा शहरात कार्यकर्ता सदिच्छा भेट दौऱ्याअंतर्गत नगरसेवक, भास्कर पाटील,माजी नगरसेवक, छत्रपती धुतमल, माळाकोळी शहरात कार्यकर्ता सदिच्छा भेट दौऱ्याअंतर्गत संतोष तिडके, केरबा सावकार बिडवई, किवळा येथे माजी सभापती शंकर ढगे, संत बाळगीर महाराज मंदिर, इच्छापूर्ती गणेश मंदिर,कौठा येथील बाबुराव देशमुख, उस्माननगर येथील बाबुराव घोरमल पाटील कापसी येथील हौसाजी रामजी कांबळे (कापसीकर), तसेच नागरिकांची चालती – फिरती भेट घेऊन संवाद साधला तदनंतर विविध मंदिरात मनोभावे पूजन करून उपस्थित भाविक-भक्तांशी मुक्त संवाद साधला.
याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे, माजी सभापती अशोकराव केंद्रे, भाजपा सरचिटणीस भारत चामे, अॅड. संभाजी पाटील, नांदेड जिल्हा भाजप उपाध्यक्ष भगवानराव राठोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते डॉ. उत्तमराव सोनकांबळे, लोहा तालुका भाजपा अध्यक्ष आनंदराव पाटील, कंधार तालुका भाजपा अध्यक्ष किशन धापाडे, मधू पाटील डांगे, मामा गायकवाड, चेअरमन शिवनखेड राजकुमार मोटे पाटील, सरपंच कवठाळी मनोहरराव बुड्डे पाटील, सरपंच शेषराव पाटील, तुकाराम वारकड गुरुजी, साईनाथ कपाळे,बालाजी बनाळे, हनुमंत शिंदे, शिवाजी चक्रधर, विजय मंदावाड, विनोद पांचाळ, शहाजी आवटे, भीमराव जमदाडे ,वडगाव सरपंच बंडू पाटील काळे, टेळ्की सरपंच संदीप देशमुख, लोंढे सांगवी सरपंच रंगराव लोढे, बोरगाव सरपंच धनाजी आढव, साईनाथ पाटील, बालाजी तिडके, काशिनाथ नामदाडे, वडगाव चेरमन बालाजी पाटील, रावसाहेब देशमुख, माजी जि.प. सदस्य चंद्रमणी मस्के, कांता बिडवे, माजी नगसेवक भास्कर पाटील, पिराजी पवार, अजय हंकारे, माजी नगरसेवक दत्ता वाले, किरण सावकार, शहाजी चाटे, सुरज साठे, गोविंद मुरकुटे, जनार्धन तिडके, राजकुमार केकाटे आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,