निलंगा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न …
माकणी (थोर) येथील सुप्रसिद्ध हनुमान मंदिरात श्री बलभीम मारुतीरायाची आरती करून प्रचाराचे श्रीफळ वाढवण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या उदंड यशाची कामना करून मारुतीरायाचे दर्शन घेतले. “ महाविजय २०२४ ” या मोहिमेचा श्रीगणेशा केला. या वेळी देवस्थान कमिटीकडून उपस्थिताचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या नियोजनाविषयी निलंगा विधानसभा मतदारसंघातील बूथ प्रमुखांचा मेळावा आज उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार श्री. संभाजीभैय्या पाटील निलंगेकर, डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर, प्रदेश सचिव श्री. अरविंदजी पाटील निलंगेकर, सरचिटणीस श्री. संजयजी दोरवे, सरचिटणीस श्री. भारत भाऊ चामे, ॲड. श्री. संभाजी पाटील, विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. दगडू साळुंखे, जयश्रीताई पाटील, निलंगा तालुका भाजपा अध्यक्ष श्री. कुमुद लोभे, शिरूर अनंतपाळ तालुका भाजपा अध्यक्ष श्री. मंगेश पाटील, देवणी तालुका भाजपा अध्यक्ष श्री. काशिनाथ गरिबे, लोकसभेचे विस्तारक श्री. सिद्धेश्वरजी पवार, जिल्हा उपाध्यक्ष श्री. शेषराव ममाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. व्यंकट धुमाळ यांच्यासह बूथप्रमुख व कार्यकर्ते उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,