भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस साजरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश.
लातूर – राष्ट्रसेवेसाठी समर्पित भारतीय जनता पार्टी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी आज लातूर शहर कार्यालय गांधी चौक, लातूर शहरातील बूथ क्रमांक 290/291, प्रभाग क्रमांक 14 मधील बूथ क्रमांक 270, प्रभाग क्रमांक 12 मधील बूथ क्रमांक 289 ते 293, प्रभाग 8 मधील बूथ क्रमांक 160 येथे साजरा केला. भारतीय जनता पार्टीने दिलेला “संघर्षाचा वारसा व विचारांचा वसा पुढे नेण्याचा दृढसंकल्प” या वेळी महायुतीचे उमेदवार श्री. सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केला.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर उपाध्यक्ष श्री. दत्ता जाधव व माजी विभाग अध्यक्ष श्री. गोविंद जाधव यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केल्यामुळे त्यांचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी भाजपा लातूर शहर अध्यक्ष श्री. देविदासजी काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. शैलेशभैय्या लाहोटी, श्री. गुरुनाथ मगे, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. गणेश गोमचाळे, श्री. संजय सोनकांबळे, श्री. प्रमोद गुडे, श्री. संतोष तिवारी, श्री. वैभव वनारसे, श्री. गजेंद्र बोकन माजी नगरसेविका श्रीमती दीपाताई गीते, श्रीमती स्वातीताई घोरपडे, श्री. विवेकजी बाजपेयी, श्री शिवसिंग सिसोदिया, मंडळ अध्यक्ष श्री. अमोल जिरे, श्री. प्रदीप मोरे, माजी नगरसेविका श्रीमती कोमलताई, मंडल अध्यक्ष श्री. अमोल गीते, माजी नगरसेवक श्री. दयानंद साळुंके, मंडळ अध्यक्ष श्री. चंद्रकांत खटके, श्रीमती शशिकलाताई गोमचाळे, मंडल अध्यक्ष श्री. अमोल गीते, माजी नगरसेवक श्री. दयानंद साळुंके, मंडळ अध्यक्ष श्री. चंद्रकांत खटके, बूथ प्रमुख श्री. धनराज जाधव, श्री. अनंत मेगशेट्टे, श्री.अरविंद बारस्कर, श्री. सुमित सुरवसे, श्री. गणेश छत्रे, श्री. धीरज हालकुडे, मंडल सरचिटणीस श्री. अभिजीत मुनाळे, सुपर वॉरियर्स नगरसेवक श्री. शैलेश स्वामी, श्री. व्यंकट वाघमारे, श्री.महेश आप्पा कोळखरे, जैन प्रकोष्ठच्या श्रीमती शोभाताई कोंडेकर, रेल्वे सल्लागार समिती सदस्य श्री. शामसुंदर मानधना, सिद्धेश्वर मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष श्री. अक्षय पतंगे, श्री. जगदीश मलंग, युवा मोर्चा सरचिटणीस श्री. गजेंद्र बोकन, श्री. जयप्रकाश मंत्री आदींसह अनेक पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,