परमपूज्य श्री. नरेंद्र महाराज यांच्या पादुका पूजन…
लातूर येथे राजीव गांधी चौकातील पंचमुखी हनुमान मंदिरातील परमपूज्य श्री. नरेंद्र महाराज यांच्या पादुकांचे पूजन महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री. सुधाकर शृंगारे यांनी केले. या मंगल प्रसंगी उपस्थित भाविक-भक्तांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी भाजपा लातूर शहर अध्यक्ष श्री. देविदासजी काळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य श्री. शैलेशभैय्या लाहोटी, भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. गणेश गोमचाळे, नगरसेवक श्री. सुनील मलवाड, मंडळ प्रमुख श्रीमती शोभाताई पाटील आदींसह अनेक पदाधिकारी, भक्तगण, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News today 24 असलम शेख लातुर,