अहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने एस. के क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
नगर : मुलांना बालवयातच क्रिकेट खेळाचे योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व एस के क्रिकेट ॲकॅडमीच्या वतीने 14 वर्षे आतील खेळाडूंसाठी एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या माध्यमातून खेळाडू घडला जाईल, क्रिकेट खेळाला खूप महत्त्व प्राप्त झाले असून करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे तरी खेळाडूंना बालवयातच क्रिकेटचे धडे मिळावेत यासाठी एस के क्रिकेट अकॅडमीच्या वतीने जिल्हास्तरीय एपीएल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले असून 14 वर्षे आतील खेळाडूंनी नाव नोंदणी करण्यासाठी कराळे हेल्थ क्लब येथे फॉर्म उपलब्ध आहे तरी निवड चाचणीसाठी आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन एस के अकॅडमीचे संचालक क्रिकेटर संदीप आडोळे यांनी केले.