Close Menu
    What's Hot

    Nilesh lanke : जिल्हा बँकेच्या प्रत्येक शाखेत एटीएम व सोनेतारण सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न : खा.लंके

    November 16, 2026

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Ahmednagar»आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो,च्या वतीने आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान संपन्न
    Ahmednagar

    आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो,च्या वतीने आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान संपन्न

    newstoday24By newstoday24April 25, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    आर्किटेक्ट इंजिनीअर्स अँड सर्व्हेअर्स असो,च्या वतीने आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान संपन्न

    आर्च, डोम आणि स्थानिक बांधकाम साहित्याचा वापर पर्यावरण पूरक सदृढ शहर विकासासाठी आवश्यक – आर्की. प्रविण माळी

    नगर : सध्याच्या काळात शहरे काँक्रिटच्या जंगलात रूपांतरित झाल्यासारखी वाटत असून सिमेंट आणि स्टील यांचा अवाजवी वापर प्रदूषणाच्या माध्यमातून आपले आरोग्य धोक्यात आणत आहे. यासाठी उपलब्ध असलेल्या नैसर्गिक बांधकाम साहित्याचा जास्तीत जास्त वापर बांधकामासाठी करणे आवश्यक आहे. सध्या पाण्यानंतर काँक्रिट हे दोन नंबरवर आहे की जे सर्वात जास्त प्रमाणात वापरले जात आहे. पर्यावरणपूरक वातावरणात राहण्यासाठी निसर्गात उपलब्ध होणारे साहित्य वापरणे आवश्यक असून त्यासाठी आर्किटेक्ट इंजिनीअर्स यांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन वास्तू विशारद प्रविण माळी यांनी केले.
    आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असो. अहमदनगर आणि एस आर जे स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील प्रथितयश आणि नामवंत वास्तू विशारद प्रविण माळी यांचे आर्च क्रांती फॉर बेटर फुचर या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी संस्था अध्यक्ष रमेश कार्ले, सहायक संचालक नगर रचना विभाग पुनम पंडित, सचिव प्रदीप तांदळे,आर्की. तेजस्विनी तोरडमल, आर्की. राज कदम, आर्की. वेदांत मिठारी, भूषण देशमुख, संजय चांडवले, सुरेंद्र धर्माधिकारी, प्रल्हाद जोशी, नंदकिशोर घोडके, वैभव देशमुख, स्वप्नील बोऱ्हाडे, आदिनाथ दहिफळे, अन्वर शेख, मयुरेश देशमुख, उदय तरवडे, संकेत पादिर, संचालक यश शहा, प्रितेश पाटोळे, सुनिल औटी, संजय कटारिया, प्रेरणा कटारिया, पायल शहा आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    दरम्यान प्रविण माळी यांनी जेष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांच्यासह नगर मधील सलाबत खान कबर, दमडी मस्जिद, बूथ हॉस्पिटल, जनरल पोस्ट ऑफिस, ह्युम चर्च, फराह बक्ष महल, रणगाडा संग्रहालय अश्या ऐतिहासिक आणि बांधकामाचे उत्कृष्ट उदाहरण असलेल्या इमारतींना भेट दिली. यावेळी त्यांनी अहमदनगरला अतिशय समृद्ध असा वास्तूंचा वारसा असून पुरातत्व विभाग आणि इतर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून तो जतन करणे आवश्यक असल्याचे नमूद केले. याचा उपयोग शहरातील प्रतिनिधी आणि सेवाभावी संस्था यांनी पर्यटन विकास करण्यासाठी करण्याचा मानस व्यक्त केला.
    यावेळी बोलताना मुख्य अतिथी सहायक संचालक नगर रचना विभाग पुनम पंडित यांनी आपला ऐतिहासिक वारसा जतन करणे आणि या प्रकाराची बांधकामे करत राहणे आवश्यक असल्याचे नमूद करून संस्था सभासदांना या उपक्रमाच्या माध्यमातून जागरूक करण्याचा स्तुत्य प्रयोग करत असल्याचे नमूद केले.
    संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी सांगितले की, सांगली कोल्हापूर या जिल्ह्यात प्रविण माळी यांनी आर्च, डोम, एक्सपोज ब्रिक्स वर्क, झाडांचे लाकूड असे विविध प्रयोग करून विविध बांधकाम प्रकल्प उभारले आहेत.तसेच याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम केले आहे. त्याचप्रमाणे संस्था सभासद यांनी पर्यावरण पूरक बांधकामावर जास्तीत जास्त भर द्यावा असे आवाहन केले.
    यावेळी संचालक यश शहा यांचा अखिल भारतीय जैन दिवकर मंच नवी दिल्ली मध्ये राष्ट्रीय युवा कार्याध्यक्ष पदी तसेच जैन समाज आणि इतर सेवाभावी संस्थांवर विश्वस्त पदी निवड झाल्याबद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव प्रदीप तांदळे यांनी केले, व पाहुण्यांचा परिचय आर्किटेक्ट मयुरेश देशमुख यांनी करून दिला,तर आभार यश शहा यांनी मानले.

    #Ahmednagar #News #update #today
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleअहमदनगर जिल्हा क्रिकेट असो.च्या मान्यतेने एस. के क्रिकेट ॲकॅडमी आयोजित एपीएल 2024 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
    Next Article पाण्याअभावी पिकांचं होतंय नुकसान ; पिरळे भागात पोटचाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी
    newstoday24
    • Website
    • Tumblr

    Related Posts

    नगर ब्रेकिंग : जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडीनंतर सुजय विखेंची सत्यजित तांबेंनी घेतली भे

    November 15, 2026

    Akshay kardile : निळवंडेच्या उजव्या कालव्याला उद्या सहा वाजता पाणी सुटणार; आमदार अक्षय कर्डिलेंच्या पाठपुराव्याला यश

    November 14, 2026

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.