पाण्याअभावी पिकांचं होतंय नुकसान ; पिरळे भागात पोटचाऱ्यांना पाणी सोडण्याची मागणी
नातेपुते: तालुक्याच्या काही भागात तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येथील बहुतांश शेती ही पोटचाऱ्यांच्या आधारावर आहे. त्यामुळे उजव्या कालव्याचे उन्हाळी आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी पालकमंञी चंद्रकांत पाटील यांना रणजितसिंह निंबाळकर यांच्या प्रचारार्थ आले असता केली आहे. पिरळे,बांगर्डे,पळसमंडळ या भागात असलेल्या पाणीटंचाईमुळे नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. काही ठिकाणची हातातोंडाशी काढणीला आलेली पिके जळून जाण्याच्या मार्गावर आहेत. पिकांना आता पाण्याची गरज आहे. जर पिकांना वेळेत पाणी मिळाले नाही तर येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भागातील चाऱ्यांना परिसरात पाण्याअभावी जळू लागलेला ऊस.,. सध्या कांदा, ऊस, मका व काही फळबागादेखील या पोटचाऱ्यांच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे या भागातील पोटफाट्यांना लवकरात लवकर पाणी सोडावे, अशी येथील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. उन्हाळी आवर्तन वेळेत आले तर येथील पाण्याचा प्रश्न मिटेल. फाट्यांला पाणी कधी येईल याचीच सर्व शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. या भागात लवकरात फाट्याला पाणी सोडण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा व अभियंता अमोल मस्कर नी यांनी दिली. तर पालकमंञी चंद्रकात पाटील यांच्या प्रयत्नामुळे उन्हाळी आवर्तन सोडण्यात येणार असल्याचे माळशिरस तालूका शिवसेना प्रमूख सतिश संपकाळ यांनी सांगितले.
यावेळी समीर शेख,निखिल पलंगे,अनिल दडस,संजय दनाणे,राहूल अडगळे,विजय बरडकर,तसेच शिवसैनिक उपस्थित होते.