महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आघाडी धर्म निभावत अंबाजोगाई शहरात प्रचारफेरीचा शुभारंभ
पंकजा ताईंना मत म्हणजे विकासाला मत:-राजकिशोर मोदी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांना मत म्हणजे विकासाला मत अशी स्पष्टोक्ती अंबाजोगाई नगरीचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केली. ते महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ आघाडी धर्म निभावत अंबाजोगाई शहरात प्रचारफेरीच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी राजकिशोर मोदी यांच्यासह माजी आमदार संजय दौंड, माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे, तानाजी देशमुख, मनोज लखेरा, किशोर परदेशी, महादेव आदमाणे, अमोल लोमटे, धम्मा सरवदे, सुनील व्यवहारे, दिनेश भराडीया, कमलाकर कोपले, दिलीप काळे, अनंत लोमटे, प्रवीण जयभाय, खालेद चाउस,गणेश मसने, सुनील वाघाळकर,काझी खयामोद्दीन, मतीन जरगर,दत्ता सरवदे,खलील जाफरी,सचिन जाधव,बबन पानकोळी, चंद्रकांत महामुनी, सुधाकर टेकाळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
या प्रचारफेरीस प्रशांत नगर,अंबिका सोसायटी,विद्याकुंज कॉलनी,बन्सीलाल नगर, शिक्षक कॉलनी, हनुमान नगर,मंगळवार पेठ, हनुमान नगर, परिसरातील नागरिकांनी संवाद साधतांना उदंड असा प्रतिसाद दिला. प्रचारफेरी दरम्यान बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री असतांना पंकजा मुंडे यांनी जिल्ह्यासाठी राबविण्यात आलेल्या विकास कामांची आठवण नागरिकांना करवून दिली. त्यांनी सर्व जातीधर्माच्या लोकांना सोबत किंवा विचारात घेऊनच जिल्ह्याबरोबरच राज्याचे नेतृत्व केले असल्याचे राजकिशोर मोदी यांनी मतदारांना पटवून दिले. यापुढेही त्या अशीच विकासाची कास धरून सामान्य माणसाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतील अशी ग्वाही देखील मोदी यांनी प्रचारादरम्यान नागरिकांना पंकजा मुंडे यांच्या वतीने दिली. तेव्हा मतदारांनी आपले आशीर्वाद रुपी मतदान पंकजा मुंडे यांच्या झोळीत भरभरून टाकावे असे आवाहन याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी केले.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ना अजितदादा पवार तसेच राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिह्यात महायुतीच्या नीती व धोरणानुसार संपूर्ण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाचाराची रणधुमाळी अतिशय जोमाने सुरू आहे. प्रत्येक जिल्हा, तालुका त्याचबरोबर ग्राम पातळीवर प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार अतिशय तळमळीने करतांना दिसून येत आहे. महायुतीच्या जाहिरनाम्यानुसार यापुढे विकास कामाची गंगा आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू असे आश्वासन ना धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांच्या वतीने राजकिशोर मोदी हे नागरिकांना देत आहेत.
आज या प्रचारफेरीस विष्णू पांचाळ, माणिक वडवनकर , रफिक गवळी, जावेद गवळी, शरद काळे, महेश कदम, सुशील जोशी, सुदाम देवकर, उज्जेन बनसोडे,सुगत सरवदे,अस्लम शेख, भारत जोगदंड,शुभम लखेरा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारात सहभागी झाले होते.