इंडो-ब्रिटिश ग्लोबल स्कूल तर्फे पालकांसाठी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संपन्न.
अंबाजोगाई (प्रतिनिधी) वैश्विक शोध प्रायव्हेट लिमिटेड पुणे संचालक श्री अमोल जोशी सर व श्री शिव गिर सर व मुख्य संचालन अधिकारी सौ स्वाती गिर मॅडम यांच्या व्यवस्थापन व मार्गदर्शनाखाली इंडो-ब्रिटिश ग्लोबल स्कूल अंबाजोगाई तर्फे अंबाजोगाई शहरात इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल पॅरेंट्स क्रिकेट लीग ही भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा फक्त पालकांसाठी आयोजित करण्यात आली होती.
हि स्पर्धा शाळेच्या भव्य अशा प्रांगणात आयोजित केली होती. या स्पर्धेत शहरातील एकूण ७८ पालकांनी त्यांचा सहभाग नोंदवला व उत्स्फूर्तपणे खेळले. ७८ पालकांचे ६ संघ तयार करण्यात आले, प्रत्येक संघात ११ खेळाडू व १ राखीव खेळाडू अशी मांडणी केली गेली. सर्व सामने साखळी मालिकेत खेळले गेले. पॅरेन्ट्स क्रिकेट लीग दिनांक २७ एप्रिल २०२४ व २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ८ ते संध्याकाळी ६ पर्यंत खेळवण्यात आले. पॅरेंट्स क्रिकेट लीग चे उदघाट्न श्री विठ्ठल सेवाभावी संस्था मोरेवाडी अंबाजोगाई चे विश्वस्त श्री रविकांत सोनावणे सर व वैश्विक शोध प्रायव्हेट लिमिटेड चे ऑपेरेशन हेड अशोक भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
या स्पर्धेत आयबीजीएस विझार्ड्स,आयबीजीएस स्टार्स,आयबीजीएस टायटन्स,आयबीजीएस स्कॉलर्स, आयबीजीएस पायनियर्स,आयबीजीएस लेजेंड्स या सहा संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेचा विजेता संघ ठरला आयबीजीएस विझार्ड्स आणि उपविजेता संघ ठरला आयबीजीएस स्टार्स. विजेत्या संघाला ट्रॉफी आणि रोख रक्कम रु.५००१/- आणि उपविजेत्या संघाला ट्रॉफी आणि रोख रक्कम रु. २०००/- देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मालिकावीर, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सर्वोत्कृष्ट गोलंदाज आणि प्रत्येक सामन्यातील सामनावीर पुरस्कार देण्यात आले. सर्व विजेत्यांना अंबाजोगाई शहरातील प्रतिष्ठित डॉ. राजेश इंगोले , कांबळे व वैश्विक शोध चे ऑपरेशन हेड अशोक भोसले यांच्या हस्ते पुरस्कृत केले व इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल पॅरेंट्स क्रिकेट लीग च्या वतीने सर्व विजेत्या संघाचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. इंडो ब्रिटिश ग्लोबल स्कूल अंबाजोगाई चे नरेश शिनगारे , प्रदीप कांबळे सर, श्री अंगद केंद्रे , संतोष सोनवणे , रवी गिरी व इंडो ब्रिटीश ग्लोबल स्कूलचे सर्व कर्मचारी यांनी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले विशेषत: पालकांसाठी आयोजित केलेल्या या एकमेव स्पर्धेचे अंबाजोगाई शहरातील सर्व पालकांकडून कौतुक होत आहे. तसेच अशा स्पर्धा अधिकाधिक वेळा घेण्यात याव्यात अशी सदिच्छा सर्व पालकांनी व्यक्त केली. हा कार्यक्रम संस्मरणीय बनवल्याबद्दल खेळाडूंपासून आयोजक आणि समर्थकांपर्यंत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानून प्रत्येक वर्षी असे नवनवीन उपक्रम राबविणार असल्याचे संस्थेचे ऑपेरेशन हेड अशोक भोसले यांनी सांगितले