महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचार फेरीचा भव्य शुभारंभ
विविध मान्यवरांच्या हस्ते कपिल गणेश मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचारफेरीची सुरुवात
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- राज्यातील महायुतीच्या बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महायुतीचा धर्म पाळत अंबाजोगाई शहरातील आदर्श कॉलनी परिसरातील कपिल गणेश मंदिरात मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेत वन टू वन प्रचारासहलगीच्या निनादात जोमाने सुरुवात केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या समवेत माजी आमदार संजय दौंड, बबनभैय्या लोमटे, माजी नगरसेवक जीवनदादा कऱ्हाड, कमलाकर कोपले, मनोज लखेरा,अनंत लोमटे, दिलीप काळे,तानाजी देशमुख, दिनेश भराडीया, खालेद चाऊस, दुर्गदास देशपांडे, शैलेंद्र कन्नडकर, महादेव आदमाणे, अनिलराव गौंड,अकबर पठाण, प्रवीण जायभाय,विकास बाभूळगावकर, उमाआप्पा शेटे, माजी नगरसेविका निलावतीताई कऱ्हाड, सुनील व्यवहारे, सुलोचनाताई बाभूळगावकर,राजू गिरी, कौस्तुभ कोदरकर, संजय कुलकर्णी, लताबाई लाड, तिडके मॅडम, ठोंबरे मॅडम, माले मॅडम, अंगद जाधव, माणिक वडवनकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्ह्यात बीड लोकसभेच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुरू आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहरात देखील राजकिशोर मोदी यांच्या कडून जोमात प्रत्यक्ष वन टू वन प्रचारास सुरुवात झाली. परिसरातील नागरिकांनी देखील यावेळी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचे चित्र पहावयास मिळाले. अंबाजोगाई शहर म्हणले की राजकिशोर मोदी असेच समीकरण शहरवासीयांच्या कडून मागील तीस वर्षांपासून पहावयास मिळते आहे. याचाच परिचय आजच्या प्रचार रॅलीतून दिसून आला. राजकिशोर मोदी हे अंबाजोगाई नगर परिषदेच्या माध्यमातून गेली तीस ते पस्तीस वर्षापासून सेवा करत आहेत. अंबाजोगाई करांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचे काम राजकिशोर मोदी यांनी अविरतपणे केले आहे. म्हणूनच आजही राजकिशोर मोदी यांच्या नावाची क्रेझ जेष्ठ नागरिकांपासून बच्चेकंपनी मधून स्पष्टपणे पहावयास व अनुभवयास मिळते आहे.
या प्रचारादरम्यान पंकजा मुंडे यांनी यापूर्वी केलेल्या कामांची आठवण करून देताना तसेच याअगोदरची अपूर्ण राहिलेली सर्व कामे केंद्र सरकारच्या मदतीने पूर्ण करण्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासन याप्रसंगी राजकिशोर मोदी यांनी नागरिकांना दिले. यासाठी आपण सर्वांनी मिळून पंकजाताई मुंडे यांना आपले अनमोल असे मतदान रुपी आशीर्वाद देऊन प्रचंड मताधिक्याने विजयी करण्यासाठीचा संकल्प करून त्यांना संसदेत पाठवण्यासाठी मेहनत करू असे आवाहन देखील मतदारांना या प्रचार फेरीदरम्यान राजकिशोर मोदी यांनी केले. प्रचार फेरी ही आदर्श कॉलनी, सारस्वत कॉलनी, नेताजी कॉलनी, माळी नगर, बोधी घाट, श्रीनगर कॉलनी, ज्योती नगर,परळी रोड हा परिसर संपूर्ण पणे पिंजून काढण्यात आला.
या प्रचारफेरीत विष्णू पांचाळ, गणेश मसने, सूनिल वाघाळकर, बबन पानकोळी, चंद्रकांत महामुनी, सुधाकर टेकाळे, जावेद गवळी,विशाल पोटभरे, सचिन जाधव, आकाश कऱ्हाड,महेबूब गवळी, रोशन लाड,महेश कदम,सुगत सरवदे, शरद काळे,अमोल मिसाळ, सनी लखेरा यांच्यासह शेकडो राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा चे कार्यकर्ते सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान महायुतीचा विजय असो, ना. अजितदादा पवार, ना. धनंजय मुंडे, पंकजाताई मुंडे, राजकिशोर मोदी यांच्या घोषणाने परिसर दुमदुमून गेला होता.