महिलेविरुद्ध बेकायदेशीर सावकारीचा गुन्हा दाखल
नगर – नगर मधील एका महिलेवर बेकायदेशीर सावकारीचा व्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीची नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात केलेल्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर सहकार अधिकारी श्रेणी -२ अल्ताप शेख (रा. आलमगीर, भिंगार) यांनी याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि.२) सायंकाळी फिर्याद दिली आहे.
शहरातील नालेगाव भागातील एक महिला बेकायदेशीर सावकारी करत असल्याची तक्रार एका तक्रारदाराने नगर तालुका उपनिबंधक कार्यालयात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने या कार्यालयातील सहकार अधिकारी श्रेणी -२ अल्ताप शेख यांनी चौकशी केली. या चौकशीत सदर महिलेने केलेले व्यवहार हे सावकारीतून केल्याचे समोर आले. त्यामुळे अल्ताफ शेख यांनी उपनिबंधक कार्यालयाच्या परवानगीने कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ चे कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.