जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेस कला सादरीकरणात उपस्थितांची मने जिंकली.
अकोले, संगमनेर श्रीरामपूर,नगर,नेवासा, राहुरीसह स्थानिक कलावंतांनी मारली बाजी
राहुरी फॅक्टरी येथे वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानने नृत्य स्पर्धा आयोजित केली होती. राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथील वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून जिल्ह्यातील जवळपास ८० स्पर्धकांनी आपली कला सादरीकरणात उपस्थितांची मने जिंकली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम,माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे,साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, उद्योजक भारत शेटे, स्वराज्य उद्योग समूहाचे शैलेंद्र शिंदे, उद्योजक स्मितेश राका,प्रकाश कुऱ्हाडे,ओमकार कोबरणे,ज्ञानेश्वर मोरे, गोपाल शिंदे,सचिन जाधव,अमोल तुरकणे, शशिकांत खाडे, दीपक माळी, अशोक पटारे,प्रशांत कोठुळे, जालिंदर दोंड,सचिन कदम,अमोल कदम,प्रसाद कदम,सुजित लोंढे,योगेश मोरे,अक्षय पेरणे,किशोर गोसावी,शरद साळुंके आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी अकोले, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा, अहमदनगर यासह जिल्ह्यातील विविध भागांतील कलाकारांनी सोलो व सामूहिक नृत्य सादर करून सर्वांची वाहवा मिळवली.स्पर्धेचे परीक्षण शिवचरित्रकार हसन सय्यद पुणे येथील रुही सय्यद व भाग्यश्री दातखीळे यांनी केले.प्रास्तविक संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीकांत जाधव यांनी केले.
या नृत्य स्पर्धेत सामूहिक नृत्य मोठा गट प्रथम विजेते स्नेहमाला डान्स अकॅडमी, श्रीरामपूर,द्वितीय विजेते चंदनेश्वर विद्यालय संगमनेर तर लहान सामूहिक नृत्यामध्ये प्रथम पारितोषिक भाग्या ग्रुप, राहुरी, द्वितीय पारितोषिक नटराज ग्रुप, राहुरी फॅक्टरी व नृत्यराज ग्रुप, अकोले यांना विभागून देण्यात आले. मोठा गट सोलो प्रकारात प्रथम पारितोषिक गौरव अनाप, अकोले व खुशी टंकवाल, अकोले यांना विभागून देण्यात आले ,द्वितीय पारितोषिक सौरभ पाटील, अहमदनगर व सुरु गवारे, श्रीरामपूर यांना विभागून देण्यात आले तर तृतीय पारितोषिक राजेश व्यवहारे, अहमदनगर व आदित्य टंकवाल, अकोले यांना विभागून देण्यात आले. लहान गट सोलो प्रकारात प्रथम पारितोषिक वेदिका एरंडे लअकोले, कृपा वाकचौरे ,अकोले यांना विभागून,द्वितीय पारितोषिक विभागून सिद्धी जंगम, राहुरी व आराध्या शिंदे अकोले, तृतीय पारितोषिक तेजस्विनी शेळके, अहमदनगर व सुष्टी बेल्हेकर, सोनई यांना विभागून तर चतुर्थ पारितोषिक संभव गाढे, राहुरी व भक्ती चुत्तर, राहुरी यांना विभागून देण्यात आले अवंतिका शेटे, देवळाली प्रवरा व तन्वी लोंढे राहुरी फॅक्टरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धा यशस्वीतेसाठी वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
News Today 24 साठी राजेंद्र उंडे राहुरी.