पवारांच्या कौतुकाने ढोबळे भारावले..!
खा.शरदचंद्र पवार यांना डी.लिट ही मानद पदवी देण्याच्या मागणीसाठी केला ६०० किलोमीटरचा प्रवास
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंञी खा.शरदचंद्र पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या प्रश्नावर न्याय मिळवून देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी मराठवाडा विद्यापीठाला “डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ” असे नामांतर करून नामांतराचा प्रश्न सोडविला होता. त्यामुळे येथील अंकुश तुकाराम ढोबळे यांनी १९९५ साली सायकल वरून अंबाजोगाई ते मुंबई असा तब्बल ६०० किलोमीटरचा प्रवास करीत लोकनेते शरदचंद्र पवार यांना डी.लिट ही मानद पदवी मिळावी म्हणून त्यावेळचे महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ.पी.सी.आलेक्झांडर यांची राजभवनात भेट घेऊन त्यांच्याकडे पहिल्यांदा ही मागणी केली होती, ढोबळे यांच्या तब्बल २८ वर्षांपूर्वीच्या मागणीला अखेर यश मिळाले. आणि छत्रपती संभाजीनगर येथे एका विशेष समारंभात महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते खा.शरदचंद्र पवार यांना डी.लिट या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. आपणांस डी.लिट ही मानद पदवी देण्याची मागणी पहिल्यांदा करणारे व या मागणीची पार्श्वभूमी कळाल्यानंतर खा.डॉ.शरदचंद्र पवार यांनी आस्थेवाईकपणे चौकशी करून अंकुश ढोबळे यांचे कौतुक केले.
नुकतेच लोकसभा निवडणूक प्रचाराच्या संदर्भात अंबाजोगाई येथे देशाचे ज्येष्ठ नेते खा.डॉ.शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा होती. सभेनंतर पवार हे अंबाजोगाईत मुक्कामी होते. मुक्कामाच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पवारांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत चर्चा झाली ती अंकुश तुकाराम ढोबळे यांची. या भेटीची पार्श्वभूमी अशी की, असा एकही विभाग नसेल की जिथे पवार साहेबांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला नाही. शेती, संरक्षण, क्रिडा, महिला सक्षमीकरण, महिलांची सैन्यभरती, सांस्कृतिक, सहकार, शिक्षण, साखर कारखानदारी, क्रिकेट, कुस्ती, औद्योगिकीकरण, व्यापार, आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन असे कित्येक विभागातील कामे पवार साहेबांनी आपल्या राजकीय जीवनात सक्रिय सहभाग नोंदवत पूर्णत्वास नेली आहेत. अशा जनहितार्थ घडत असलेल्या कार्याकडे एक समाजमन, निस्सीम व आजतागायत कोणती ही अपेक्षा न ठेवता पवार साहेबांच्या बहुआयामी नेतृत्वावर केवळ निरपेक्ष भावनेतून निराशय प्रेम करणाऱ्या अंकुश तुकाराम ढोबळे या कार्यकर्त्याचे लक्ष आपसूक या विषयाकडे आकर्षिले गेले. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील एक युवक १९९६ साली पवार साहेबांनी केलेल्या समाजहिताच्या व लोकाभिमुख कार्याने अतिशय प्रभावित झाला होता. त्या युवकाचे नांव अंकुश ढोबळे, आज हे अंकुशराव एक सक्रीय समाजसेवक असून त्यांचे वय ५१ वर्षे आहे. त्यावेळी ढोबळे यांनी पवार साहेबांचा मराठवाडा विद्यापीठ नामविस्ताराचा घेतलेला निर्णय असो, किल्लारी भूकंपातील मनाने आणि धनाने उध्वस्त झालेल्या माणसाला सावरून पुन्हा जगण्याची नवी उमेद निर्माण करून दिल्याचे उदाहरण असो, त्याचबरोबर पवार साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेचे विकेंद्रीकरण करीत सर्व जातीधर्मांना आणि महिलांना सत्तेचा अधिकार मिळवून देण्याचे कार्य असो. या आणि अशा असंख्य लोकहिताच्या निर्णयांमुळे १९९६ साली अंकुश ढोबळे व त्यांचे मित्र भारत वेडे यांनी पवार साहेबांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने डी.लिट. ही मानद पदवी देऊन सन्मानित करावे अशा आशयाचे निवेदन घेवून विद्यापीठाचे कुलपती तथा राज्याचे महामहिम राज्यपाल यांना देण्यासाठी हे दोन मित्र १७ डिसेंबर १९९६ रोजी कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता अंकुश ढोबळे व भारत वेडे या दोघा मिञांनी १७ डिसेंबर १९९५ ते ७ जानेवारी १९९६ या कालावधीत तब्बल ६०० किलोमीटर अंतराचा व एक महिन्याचा अंबाजोगाई ते मुंबई प्रवास केला होता. अन् तोही चक्क सायकलवरून केला. ते थेट मुंबईकडे निघाले. या दोनही ध्येयवेड्या अवलियांनी अंबाजोगाई, बीड, जामखेड, बारामती, सासवड, पुणे, पनवेल मार्गे मुंबई गाठली. मुंबई मध्ये त्यांना अरूण मेहता हे मोठे व्यक्तिमत्व भेटले. त्या मेहता साहेबांच्या पुढाकारामुळेच राज्यपालांना भेटण्यासाठी १० दिवसानंतरची वेळ ढोबळेंना मिळाली. त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल डॉ.पी.सी.आलेक्झांडर यांची अंकुश ढोबळे यांच्यासह भारत वेडे या दोघांनी राजभवनात भेट घेऊन लोकनेते पवार यांना डी.लिट. ही मानद पदवी बहाल करून पवार साहेबांच्या कार्याचा गौरव करावा. या आशयाचे निवेदन महामहीम राज्यपालांना देवून सदरील मागणी केली होती. सदर प्रकरणी राजभवनातील सर्व अधिकाऱ्यांनी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यांना एक पत्र तयार करून पाठविले व त्याची एक प्रत श्री.ढोबळे यांना दिली. हा झाला ढोबळे व वेडे यांनी २८ वर्षांपूर्वी सुरू केलेला पहिला प्रयत्न. खरे तर ही मागणी सर्वप्रथम करणारे व याच मागणीसाठी उपोषणाचा इशारा देणारे खा.पवार यांचे अंबाजोगाई तालुक्यातील शेपवाडी येथील कट्टर समर्थक अंकुश तुकाराम ढोबळे यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले आहे. त्यावेळी या सायकलस्वारांचे प्रत्येकालाच मोठे कुतूहल वाटत होते. त्यावेळचे राजभवनचे कुलपतीचे अवर सचिव सु.मो.डाखोरे यांनी १६ जानेवारी १९९६ रोजी पत्र पाठवून सदर कार्यवाही बाबत विद्यापीठाच्या कुलसचिवांना कळविले होते. विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ.शिवराज नाकाडे, तत्कालिन प्राध्यापक आणि नंतर विद्यमान व्यवस्थापन समितीचे सदस्य असलेले प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे यांची भेट घेतली होती. तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने दीड वर्षांपूर्वी शनिवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२२ रोजी राज्यपालांच्या उपस्थितीत डी.लिट.ही मानद पदवी एका विशेष समारंभात ज्येष्ठ नेते खा.शरदचंद्र पवार यांना आदरपूर्वक प्रदान करण्यात आली. ही बाब अतिशय आनंदाची व स्वप्नपूर्ती होत असल्याने समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून अंकुश ढोबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी त्यावेळी बोलताना व्यक्त केली होती. नुकतेच लोकसभा निवडणूक प्रचाराच्या संदर्भात अंबाजोगाई येथे देशाचे ज्येष्ठ नेते खा.डॉ.शरदचंद्र पवार यांची जाहीर सभा होती. सभेनंतर पवार हे अंबाजोगाईत मुक्कामी होते. मुक्कामाच्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी पवारांना भेटण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीत अंकुश तुकाराम ढोबळे यांनी ही पवार साहेबांची भेट घेतली. यावेळी पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार यांच्याशी अंकुश ढोबळे यांचा परिचय करून देत असताना केज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार पृथ्विराज साठे, डॉ.नरेंद्र काळे व हाजी खालेक कुरेशी यांनी सांगितले की, आपणांस डी.लिट ही मानद पदवी देण्याची मागणी पहिल्यांदा करणारे ढोबळे हे आहेत. तेव्हा या मागणीची पार्श्वभूमी कळाल्यानंतर खा.डॉ.शरदचंद्र पवार यांनी आपल्यावर निस्वार्थीपणे प्रेम करणाऱ्या अंकुश ढोबळे यांची आस्थेवाईकपणे चौकशी करून ढोबळे यांच्या कार्याचे मनापासून कौतुक ही केले. याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना अंकुश ढोबळे म्हणाले की, खा.शरदचंद्रजी पवार साहेब हे या देशातील एक अतिशय उत्तुंग असे व्यक्तिमत्व आहे. देशातील विविध क्षेञात पवार साहेबांनी आपल्या लोकाभिमुख कार्याचा ठसा उमटविला आहे, खा.शरदचंद्रजी पवार साहेब व केंद्रिय मंञी नितीनजी गडकरी साहेब यांना दीड वर्षांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे दीक्षांत समारंभात डी.लिट ही मानद पदवी देऊन सन्मानित करण्यात आले ही खरीच आनंददायी बाब आहे, त्यामुळे मी अंकुश ढोबळे व माझे मित्र भारत वेडे आमच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पवार साहेबांना हि पार्श्वभूमी अठ्ठावीस वर्षांनंतर का होईना कळाली. पवार साहेब हे माझे दैवत आहे. साक्षात दैवताची भेट झाली. यामुळे आम्ही कृतार्थ झालो आहोत. आपली मागणी पूर्ण झाल्याने श्री.ढोबळे यांनी त्यावेळी अंबाजोगाई शहरात पेढे वाटून आनंद साजरा केला होता. अंकुश ढोबळे यांच्या नंतर अनेकांनी ही मागणी केली ही असेल, ते याचे श्रेय ही घेतील. परंतू, अंकुशराव यांच्यासारखे विविध क्षेत्रातील लाखो तरूण, कार्यकर्ते व पाठीराखे प्रतिकूल राजकीय परिस्थितीत ही पवार साहेबांच्या पाठीशी मागील पन्नास वर्षांहून अधिक काळ व आज ही कोणत्याही पदाची, लाभाची अपेक्षा न ठेवता कायमच भक्कमपणे उभे आहेत. त्यामुळेच की, काय महाराष्ट्राच्या अपराजित योध्याचा व लोकनेत्याचा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आज ही दरारा कायम आहे. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही.