अकोट तालुक्यात गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या फळबाग पिकाची त्वरित नुकसान भरपाई द्या
शिवसेनेचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन
अकोट तालुक्यातील रुईखेड,पणज, महागाव,अकोली जहागीर,दिवठाणा,अंबाडी,राजुरा,सह आंबोडा पिंप्री उमरा पणज मंडळ दि. 18-05-2024 रोजी गरपीट व अवकाळी पाण्यामुळे फळ बागांचे केळी,लिबू संत्रा,ज्वारी,भूईमूग पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे अकोट तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ आली आहे.तरी आपण अकोट तालुक्यातील नुकसान झालेल्या शेतीचे त्वरित पंचनामे करून हेक्टरी 1 लाख रुपये तात्काळ मदत देण्यात यावी व ज्या शेतकऱ्याने पिक विमा काढला आहे त्या शेतकऱ्याचा क्लेम ऑनलाइन पिक विमा कंपनी घेत नाही आहे तसेच पिक विमा पोर्टल बंद आहे व कर्मचारी शेतकऱ्याचे फोन उचलत नाही आहे.त्यामुळे शेतकरी पिक विम्या पासून वंचीत राहत आहे तरी आपण पिक विमा कंपनीला लेखी सूचना देऊन विमा कंपनी यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी तसेच दावा क्लेम ऑफ लाइन अर्ज स्वीकारण्यात यावे.व संपूर्ण नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.यावेळी माजी आमदार संजय गावंडे,उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे,जिल्हा समन्वयक श्याम गावंडे,तालुका प्रमुख ब्रम्हकुमार पांडे,युवासेना उपजिल्हासंघटक मनीष कराळे मा,प,सदस्य साहेबराव भगत जि,प सदस्य,जगन निचळ जि,प,सदस्य राजू मोरे,शहरप्रमुख मनोज खंडारे,अमोल पालेकर,राहुल पाचडे,रोशन पर्वतकर,विजय ढेपे,अक्षय घायल रमेश खिरकर,बंडू बोरकर,उमेश आवारे दिनेश बोचे सचिन सोनोने ,राजीराज ढगे,विवेक डिक्कर ,देविदास वसू ,नंदकिशोर वसु, गौरव राऊत,विनोद वानखडे,सरांगधर राऊत ,संकेत वाडखडे,आशिष अस्वार,दिनेश बोचे अतुल देशमुख,अतुल सावरकर,प्रशांत देशमुख,सुखदेव ताडे, अमोल सावरकर ,प्रवीण धुळे ,मोहन धुळे ,सुरेद्र देशमुख ,प्रफुल मानकर ,श्याम वडतकार,समीर अस्वार ,विजय अस्वार ,विनोद् अस्वार,सतीश माकोडे ,अनिल ठाकरे ,गोपाल भलतीलक ,गजानन भलतीलक,अनिल ठाकरे ,रामदास ठाकरे,महादेव वारहूरवाघ,महेंद्र काळे,मंगेश लांबसे ,धीरज शेळके,यागेश मेतकर ,निलेश थोरात ,प्रशांत मेतकर,गणेश राऊत ,विजय अस्वार व बहुसंख्य शेतकरी बांधव प्रामुख्याने उपस्तिती होती.
न्युज़ टुडे 24
मोहम्मद जुनैद अकोट