कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त : अंबाजोगईत २६ मे रोजी राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार वितरण व व्याख्यान
अंबाजोगाई (प्रतिनिधी) –
शोषित, पिडीत व उपेक्षितांच्या न्याय हक्कासाठी शासन, प्रशासन व प्रस्थापितांच्या विरोधात बंड करून सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्य झिजवणारे कर्मवीर ऍड.एकनाथराव (जिजा) आवाड यांच्या स्मृतीदिनानिमित्त महाराष्ट्रात उपेक्षित माणसांच्या न्याय हक्कासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळावी. यासाठी युवा प्रतिष्ठान, अंबाजोगाईच्या वतीने समाजात प्रबोधन करणारे, धम्म चळवळ गतीमान करून योगदान देणारांना हा पुरस्कार दिला जातो. पुरस्काराचे हे ८ वे वर्ष आहे. कर्मवीर ऍड.एकनाथराव आवाड राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार-२०२४ चे वितरण व मान्यवरांचे व्याख्यान रविवार, दि.२६ मे २०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.विजय कुमठेकर (जालना) तर यावेळी मानवी हक्क अभियानचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.डॉ.मिलींद आवाड (जे.एन.यु.दिल्ली) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. या प्रसंगी सचिन बगाडे (पुणे) यांना राज्यस्तरीय विद्रोही कार्यकर्ता पुरस्कार – २०२४ देवून सन्मानित करण्यात येणार आहे. या प्रसंगी सत्यशोधक समाज महासंघाचे अध्यक्ष डी.एस.नरसिंगे, सामाजिक कार्यकर्ते आर.डी.जोगदंड, दत्त सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत दहिफळे, स्वप्नपूर्ती सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष शितल लांडगे (केज), भारतीय सत्यशोधक महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शिंदे, ल.सा.क.चे संस्थापक सदस्य नरसिंग घोडके हे मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अंबाजोगाई येथे रविवार, दि.२६ मे रोजी दुपारी २ वाजता दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, पत्रकार भवन, नगरपरिषद सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमासाठी अंबाजोगाई शहर व परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष व आयोजक अशोक पालके, संतोष नरसिंगे, नकेश कांबळे, धीमंत राष्ट्रपाल, हनुमंत गायकवाड, अविनाश हजारे, नितीन होलबोले, महेंद्र कांबळे, नितीन वाघमारे, दत्ता पालके, हनुमंत रणदिवे, बळीराम उपाडे, रेखा सरवदे, महेश जोगदंड, दशरथ कांबळे, दिपक पालके, राम जोगदंड, प्रशांत भालेराव, प्रदीप कांबळे, सुंदर खाडे, दिलीप पालके, अरूण शिंदे, किशोर वाघमारे, मारूती मस्के, काशिनाथ कांबळे, अशोक ढगे, विवेक जाधव आदींनी केले आहे.