बियाण्याची उगवण क्षमता पाहून सोयाबीन पेरणी करावी – किशोर आडगळे
वाघाळा येथे कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम पुर्व मार्गदर्शन
जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजूरकर व तालुका कृषी अधिकारी विजयकुमार पवार यांच्या मार्गदरशनाखाली मौजे वाघाळा व वाघाळवाडी येथे खरीप हंगाम पुर्व मार्गदर्शन करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. कृषी विभागाच्या 28 सूत्रे कार्यक्रम अंतर्गत कृषी सहायक किशोर प्रभाकर अडगळे यांनी घरचे बियाणे पेरणी वर भर ,सोयाबीन बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक मोहीम, उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक मोहीम, हुमनी कीड नियंत्रण प्रात्यक्षिक, फळबाग आच्छादन,नवीन फळबाग लागवड रुंद सरी वरंबा पद्धतीने पेरणी व त्याचे फायदे,मागेल त्याला शेततळे,महाडीबीटी वर विविध घटकासाठी अर्ज प्रक्रिया,पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, सद्य परिस्थितीत सूक्ष्म सिंचनाचा वापर व कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच सौ सविता संतोष भगत उपसरपंच दत्ता चव्हाण ग्रामसेवक सौदागर मोठ्या संख्येने शेतकरी, महिला शेतकरी उपस्थित होत्या