भोसा येथे ट्रॅव्हल्सची डीव्हायडर ला धडक चालक व प्रवासी सुखरूप
भोसा – देवदर्शन करून माहूर वरून आर्णि कडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्र. (यन.यल०१बी.२४५७) या ट्रॅव्हल्सची भोसा येथे डीव्हायडर ला धडक लागली. हि घटना काल दुपारी १ च्या सुमारास घडली. धडक लागुण ट्रॅव्हल्स बंद पडल्याने जिवीत हानी टळली. अपघात होताच भोसा येथील प्रेम खंदारे व नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली. भोसा येथिल मदत केंद्रातील विकास खडसे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून क्रेन च्या साह्याने ट्रॅव्हल्स काढून वाहतुक सुरळीत करून दिली. पुढील तपास सुरू आहे.