परभणीत राज्यस्तरीय महानृत्य स्पर्धा संपन्न राज्यभरातून नामवंत कलाकारांचा सहभाग.
परभणी- परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनच्या वतीने दि. 28 मे रोजी परभणी शहरातील बी.रघुनाथ सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मागासवर्गीय विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय युवा जल्लोष महानृत्य स्पर्धा संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नेते गौतम मुंडे , डॉ राजगोपाल कालानी, सौ.पुनम मारवा, अँड.रवि गायकवाड, पि.टी.प्रधान, आकाश लहाने, सुधीर कांबळे, पत्रकार रमाकांत कुलकर्णी, अमोल गायकवाड, चंद्रशेखर साळवे, अकबर जहांगीरदार, किरण मानवतकर गौतम भराडे , आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. सत्कारमूर्ती डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांचा मानाचा फेटा बांधून भव्य सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उद्घाटक आमदार डॉ.राहुल पाटील यांनी आपल्या मनोगतात “धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व राजकारण सर्व क्षेत्रांमध्ये डॉ.सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे, त्यांनी सर्वच घटकांसाठी कार्य केले आहे. त्यामुळे ते सर्वमान्य व सर्वव्यापी नेतृत्व आहेत” असे प्रतिपादन केले. सत्काराला उत्तर देताना डॉ सिद्धार्थभाऊ हत्तीअंबीरे यांनी “आपण सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. येणार्या काळात अशाच दर्जेदार व गुणवत्तापूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल” असे आश्वासन दिले. राज्यस्तरीय युवा जल्लोष महानृत्य स्पर्धेचे हे चौथे वर्ष आहे. वैयक्तिक नृत्य शालेय, खूला गट आणि लावणी नृत्य हे गट होते. राज्यभरातील दर्जेदार असे ७० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला. परिक्षक म्हणून डॉ. सिद्धार्थ मस्के,पंकज खेडकर, संदीप राठोड, सुनंदा दिघोळकर, अनुराधा कांबळे, अनामिका अहिरे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा परभणी जिल्हा कल्चरल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ सुनील तुरुकमाने यांनी केले, तर सूत्रसंचालन असोसिएशनचे सचिव राहुल वाहिवळ यांनी केले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सोहम खिल्लारे, कपिल भरणे, पंकज खंदारे, प्रेम लहाने, विशाल उफाडे, शेख जावेद, संदीप गायकवाड, प्रा. अतुल वैराट, धनंजय खीराव यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी राहुल वाहीवळ परभणी