लातूरच्या एम आय डी सी मधील गुटखा कारखान्यावर धाड. ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० चा मुद्देमाल जप्त.
लातूर : साह्ययक पोलीस अधिक्षक बी चंद्रकांत रेड्डी यांना गोपनीय माहिती मिळाली की अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना चालू आहे. सदर माहिती पोलीस अधीक्षक सोमया मुंडे यांना कळवून त्यांचे परवानगीने व अपर पोलीस अधीक्षक देवरे यांचे मार्गदर्शनात अतिरिक्त एमआयडीसी लातूर येथे सहाय्यक पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी, पोलीस उपनिरीक्षक चिरमाडे, पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे, हेड कॉन्स्टेबल विष्णू गुंडरे व इतर पोलीस अमलदाराच्या टीम बनवून कोंबडे ऍग्रो एजन्सी या वेअर हाऊस वर छापा मारला असता छाप्यामध्ये बनावट गुटखा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल सुपारी तंबाखू पावडर तसेच मिक्सर व सिलिंग करणाऱ्या मशीन तसेच पॅकिंगचे गोवा 1000 असे छापील कॅरीबॅग, बनावट गुटखा, एक ट्रक व एक पिकप असा एकूण 03,05,73,400/- रुपये चा मुद्देमाल मिळून आला. सदरचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे दि.२९/५/२०२४, रोजी र जी नं 362/2024 कलम 328 गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरिक्षक साहेबराव नरवाडे हि करित आहेत.
News today 24 असलम शेख लातुर,