Close Menu
    What's Hot

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    पत्रकार संरक्षण कायद्याचं नोटिफिकेशन लवकरच निघणार

    April 9, 2025
    Facebook X (Twitter) Instagram
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    • Home
    • Ahmednagar
    • Breaking
    • India
    • Maharashtra
    NEWS 24 TODAYNEWS 24 TODAY
    Home»Maharashtra»पतंजलि योग समितीच्या ७५ शिबिरांतून माजी सैनिक दत्ता लांब यांनी ४५ हजार विद्यार्थ्यांना मोफत योग शिकवला
    Maharashtra

    पतंजलि योग समितीच्या ७५ शिबिरांतून माजी सैनिक दत्ता लांब यांनी ४५ हजार विद्यार्थ्यांना मोफत योग शिकवला

    newstoday24By newstoday24May 31, 2024No Comments3 Mins Read
    Facebook WhatsApp Twitter Email LinkedIn Telegram Pinterest Reddit
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पतंजलि योग समितीच्या ७५ शिबिरांतून माजी सैनिक दत्ता लांब यांनी ४५ हजार विद्यार्थ्यांना मोफत योग शिकवला

    अंबाजोगाई (प्रतिनिधी) : सामाजिक बांधिलकी जोपासत शहर व तालुक्यातील विविध शाळा तसेच महाविद्यालयातून तब्बल ४५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना मागील १० महिन्यांपासून योगाचे मोफत धडे देण्याचे काम माजी सैनिक योग प्रशिक्षक दत्ता सदाशिव लांब यांनी केले आहे. त्यांच्या ७५ व्या हिरक महोत्सवी योग विज्ञान शिबिराच्या सांगता समारोहाचे आयोजन मंगळवारी लोखंडी सावरगाव येथे करण्यात आले होते. पतंजलि योग समितीचे मुख्य योग प्रशिक्षक माजी सैनिक आयुर्वेदिक चिकित्सक दत्ता लांब यांनी मागील १० महिन्यांहून अधिक काळ तब्बल ७५ निःशुल्क योग शिबिरांचे आयोजन केले आहे. योग दिंडी आपल्या दारी या अभियानांतर्गत पतंजलि योग समिती, अंबाजोगाई व ज्ञानदीप अकॅडमी, लोखंडी सावरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७५ व्या हिरक महोत्सवी योग विज्ञान शिबिराचा सांगता समारोह मंगळवार, दिनांक २८ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनिता दिदी (अंबाजोगाई सेवा केंद्र संचालिका), तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच मनोज देशमुख (लोखंडी सावरगाव), नितेश शिराळे (मुख्याध्यापक, जि.प.प्रा.शा, सोनपेठ), धनंजय इंगळे (प्रभारी, पतंजलि योग समिती, अंबाजोगाई), सौ.स्वप्नाली शिराळे (चेअरमन, पिताजी सारडा नगरी व ग्रा.म.स.देवठाना), सौ.लक्ष्मी देवी (महिला सैनिक सीएआरपी), भानुदास देशमुख (किसान प्रभारी, पतंजलि योग समिती, अंबाजोगाई), दत्तात्रय दराडे (संचालक, ज्ञानदीप अकॅडमी), अभियंता अनिल लोमटे, भागवत कांबळे (योग शिक्षक व माजी अध्यक्ष रोटरी), सुनिता दराडे (संचालिका, ज्ञानदीप अकॅडमी), ब्रम्हाकुमारी प्रिया बहेनजी या उपस्थित मान्यवरांनी माजी सैनिक दत्ता लांब (योग शिक्षक व प्राकृतिक चिकित्सक) यांचा यथोचित सन्मान केला. तर यावेळी लागोपाठ तीन योग शिबिरांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल दत्तात्रय दराडे यांना पतंजलिकडून मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देण्यात आले. या प्रसंगी लांब यांनी फिटनेससाठी उपयुक्त ठरतील अशी योगासने शिकवली. अवघ्या सात मिनिटांत योगातील विविध ८४ आसने करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तसेच शिवतांडव द्वारे मान्यवरांचे स्वागत केले. या ७५ व्या हिरक महोत्सवी शिबीरात २५० विद्यार्थी व नागरिकांना ही मोफत योग शिक्षण देण्यात आले. तर यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना लांब यांच्या निःशुल्क, निस्वार्थ योगसेवेचे कौतुक केले. लांब हे भारतीय सैन्यात फिजीकल शिक्षक म्हणून कार्यरत होते. म्हणून त्यांच्या अनुभवाचा आणि मौलिक मार्गदर्शनाचा फायदा सैन्य, पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लाभदायक ठरत आहे असे सांगितले. तसेच पतंजलि योग समितीच्या योग दिंडी आपल्या दारी या समाजोपयोगी अभियानाचे ही विशेष कौतुक केले. अध्यक्षीय समारोप राजयोगिनी ब्रम्हाकुमारी सुनिता दिदी (अंबाजोगाई सेवा केंद्र संचालिका) यांनी केला. दैनंदिन जीवनात योगाचे काय महत्त्व आहे. ते नि:शुल्क शिकविण्याचे काम लांब हे करीत आहेत. अंबाजोगाई शहर व तालुक्यातील अनेक शाळा व महाविद्यालयातून विद्यार्थ्यांसाठी १५,९,६,३,२ व १ दिवसीय योग प्रशिक्षण शिबीर घेवून आजपावेतो त्यांनी ७५ शिबिरांमधून तब्बल ४५ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना दिनचर्या, आहार, योगिक डि.बिन्द्रिक, प्राणायाम, सर्व प्रकारचे आसन, योगनिद्रा, ध्यान यांचा अभ्यास व योगाचे धडे देण्याचे मौलिक काम माजी सैनिक लांब हे करीत आहेत. २१ वर्षे भारतीय सैन्य दलात असताना देखील लांब यांनी दरमहा आपली आर्धी पगार गोर-गरीबांसाठी खर्च केली आहे. सैन्यात देशसेवा करून निवृत्तीनंतर ही मागील १० महिन्यांहून अधिक काळ ते आपली आर्धी पेंन्शन सामाजिक उपक्रमांसाठी खर्च करीत आहेत. ही खरच प्रेरणादायी व कौतुकास्पद बाब आहे. माजी सैनिक दत्ता लांब हे योगाच्या माध्यमातून समाजसेवा करीत आहेत. अंबाजोगाई शहर व परिसरातील युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यांना निःशुल्क, मोफत योग सेवा देवून त्यांचे स्वास्थ निरोगी राहण्यासाठी ते आहोरात्र प्रयत्नशील आहेत. या बाबत त्यांच्याशी संवाद साधला असता योग प्रशिक्षक लांब यांनी सांगितले की, पतंजलि योग समितीच्या माध्यमातून व ज्ञानदीप अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने युवा पिढीसाठी आम्ही लागोपाठ तीन वेळेस योग शिबीर आयोजित केले होते. या सर्व ७५ शिबिरांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ही सर्व शिबीरे विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजित करण्यात आलेली होती. या पुढेही निःशुल्क आणि मोफत योग प्रशिक्षण देण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याचा लाभ अंबाजोगाईतील सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी सैनिक योग प्रशिक्षक लांब यांनी केले आहे.

    #Breakig #news #Update
    Share. Facebook WhatsApp Telegram Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Previous Articleस्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या सीटी स्कॅन मशिन सुरु होण्याच्या हालचालींना वेग
    Next Article लातूरच्या एम आय डी सी मधील गुटखा कारखान्यावर धाड. ३ कोटी ५ लाख ७३ हजार ४०० चा मुद्देमाल जप्त
    newstoday24
    • Website

    Related Posts

    मनपा आयुक्त यशवंत डांगे यांच्यासह चार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कारवाई करावी

    May 24, 2025

    नगर ब्रेकिंग : नगर शहरात सहा जणांनी केला तरुणाचा खून… धक्कादायक कारण आले समोर

    April 25, 2025

    अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांना “2024 बेस्ट चेअरमन ऑफ दि इयर” पुरस्कार

    December 15, 2024
    Add A Comment
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025
    • Home
    • About

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.