नाशिक परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी रंजनकुमार शर्मा
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर हे शुक्रवार (दि.३१) सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या रिक्त जागी रंजनकुमार शर्मा (विशेष पोलीस महानिरीक्षक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३१ मे २०२४ रोजी गृह विभागाने रंजनकुमार शर्मा यांच्याकडे विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली.